मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Justice Lalit : वकील ते देशाचे सरन्यायाधीश.. जाणून घ्या मराठमोळ्या जस्टिस यूयू लळीत यांच्याविषयी

Justice Lalit : वकील ते देशाचे सरन्यायाधीश.. जाणून घ्या मराठमोळ्या जस्टिस यूयू लळीत यांच्याविषयी

Aug 10, 2022, 11:57 PM IST

    • आता सरन्यायाधीश म्हणून विराजमान होणाऱ्या उदय लळीत यांनी आपले शिक्षण मुंबईत पुर्ण केले असून त्यांनी १९८३ मध्ये आपल्या वकिलीला सुरुवात केली होती. ललित महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सुपुत्र आहेत.
जस्टिस यूयू लळित

आता सरन्यायाधीश म्हणून विराजमान होणाऱ्या उदय लळीत यांनी आपले शिक्षण मुंबईत पुर्ण केले असून त्यांनी१९८३ मध्येआपल्या वकिलीला सुरुवात केली होती.ललित महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगडतालुक्यातील सुपुत्रआहेत.

    • आता सरन्यायाधीश म्हणून विराजमान होणाऱ्या उदय लळीत यांनी आपले शिक्षण मुंबईत पुर्ण केले असून त्यांनी १९८३ मध्ये आपल्या वकिलीला सुरुवात केली होती. ललित महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सुपुत्र आहेत.

जस्टिस यूयू लळीत वकील ते थेट  सुप्रीम कोर्टाचे जज आणि आता मुख्य न्यायाधीश बनणारे दूसरे जज आहेत. यापूर्वी माजी जस्टिस एसएम सीकरी देशातील १३ वे मुख्य न्यायाधीश बनले होते. त्यांनाही बार कॉन्सिल ते थेट सुप्रीम कोर्टाचे जज बनवण्यात आले होते. जस्टिस सीकरी यांचा कार्यकाळ १९७१ ते एप्रिल १९७३ पर्यंत होता. मात्र  जस्टिस लळीत यांचा कार्यकाळ केवळ ७४ दिवसांचा असणार आहे. ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

मुंबईत शिक्षण व कोकणचे सुपूत्र -

आता सरन्यायाधीश म्हणून विराजमान होणाऱ्या उदय लळीत यांनी आपले शिक्षण मुंबईत पुर्ण केले असून त्यांनी १९८३ मध्ये आपल्या वकिलीला सुरुवात केली होती. ललित महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सुपुत्र आहेत. ते भारताचे ४९ वे सरन्यायाधीश (Chief Justice)  होणार आहेत. २७ ऑगस्टला न्यायमूर्ती उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती केली. सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा एक दिवस अगोदर २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.

जस्टिस लळीत ऑगस्ट २०१४ मध्ये वकील ते थेट सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनवले गेले होते. त्यांचे वडील मुंबई हाईकोर्टात न्यायाधीश होते. लळित तिहेरी तलाकला बंदी आणणाख्या खंडपीठाचे सदस्य राहिले आहेत. जानेवारी २०१९ मध्ये अयोध्या रामजन्म भूमी वादावर सुनावणी करणाऱ्या संविधान पीठातून जस्टिस लळीत स्वत: हून बाजुला झाले होते. त्यांनी म्हटले होते की, या प्रकरणी १९९७ मध्ये उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे वकील राहिले आहेत. त्यामुळे ते या खंडपीठाचे भाग असणार नाहीत. 

पीएफ/पेन्शन फंड प्रकरणाची सुनावणी -
जस्टिस लळीत सध्या देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण प्रकरण, वेतनातून पीएफ/पेन्शन फंड कपातीची मर्यादा वाढवण्याच्या विरुद्ध ईपीएफओच्या याचिकांवर सुनावणी करत आहेत. 

विभाग

पुढील बातम्या