मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jio World Plaza : रिलायन्सचा लक्झरी मॉल मुंबईकरांसाठी खुला, जिओ वर्ल्ड प्लाझात कोणत्या सुविधा मिळणार?

Jio World Plaza : रिलायन्सचा लक्झरी मॉल मुंबईकरांसाठी खुला, जिओ वर्ल्ड प्लाझात कोणत्या सुविधा मिळणार?

Nov 03, 2023, 12:09 PM IST

    • Jio World Plaza Mumbai : मुंबईच्या बीकेसीतील जिओ वर्ल्ड प्लाझा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा रिलायन्सकडून करण्यात आली आहे.
Jio World Plaza Mumbai (HT)

Jio World Plaza Mumbai : मुंबईच्या बीकेसीतील जिओ वर्ल्ड प्लाझा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा रिलायन्सकडून करण्यात आली आहे.

    • Jio World Plaza Mumbai : मुंबईच्या बीकेसीतील जिओ वर्ल्ड प्लाझा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा रिलायन्सकडून करण्यात आली आहे.

Jio World Plaza Mumbai : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांनी मुंबईतील जम्बो मॉल बांधला आहे. भारतीय आणि विदेशी पद्धतीचे खानपान, पेहराव आणि अन्य सुविधा या नव्या जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमध्ये या नव्या मॉलचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. एक नोव्हेंबर पासून रिलायन्सचा जिओ वर्ल्ड प्लाझा सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु या देशातील सर्वात मोठ्या मॉलची खासियत काय आहे?, हे जाणून घेवूयात.

ट्रेंडिंग न्यूज

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Viral News: पोटच्या ३ वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरले; २ तासानंतर पालकांच्या लक्षात आलं, तोपर्यंत…

Madhavi Raje Scandia : राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अनेक नेते उपस्थित

kozhikode hospital news : बोटाचं ऑपरेशन करायचं होतं, जिभेचं करून टाकलं! सरकारी रुग्णालयात घडला हादरवून टाकणारा प्रकार

-जिओ वर्ल्ड प्लाझाच्या माध्यमातून रिलायन्स कंपनीने जागतिक ब्रँड्सना एकत्र आणण्याची योजना आखली आहे. रिलायन्सच्या संचालिका इशा अंबानी यांनी या भव्य मॉलची कल्पना सूचवली होती. एकाच छताखाली भारतासह जगातील अनेक देशातल्या ब्रँड्सचे प्रॉडक्ट उपलब्ध असतील.

-जिओ वर्ल्ड प्लाझा चार स्तरांवर ७५०००० चौरस फुटांवर बांधण्यात आलेलं आहे. अमेरिकेतील आर्किटेक्चर्सकडून या नव्या मॉलचं डिझाईन तयार करण्यात आलं होतं. या मॉलची रचना ही कमळाचे फुलावर आधारित आहे. जिओ प्लाझामध्ये शिल्पकला, संगमरवरी दगडांचं कोरीव काम, उंच मजले आणि कलात्मक पद्धतीची लाईटिंग बसवण्यात आली आहे.

- जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये तब्बल प्रसिद्ध ६६ ब्रँड्सचे प्रॉडक्ट असणार आहे. बॅलेन्सियागा, जियोर्जिओ अरमानी कॅफे, पॉटरी बार्न किड्स, सॅमसंग एक्सपीरियन्स सेंटर, ईएलएन कॅफे आणि रिमोवा यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा यात समावेश आहे. याशिवाय व्हॅलेंटिनो, टोरी बर्च, वायएसएल, व्हर्साचे, टिफनी, लाडुरी, पॉटरी बार्नच्या, लुई व्हिटॉन, गुच्ची, कार्टियर, बॅली, ज्योर्जियो अरमानी, डायर, वायएसएल आणि बल्गारी सारख्या इतर आयकॉनिक ब्रँड्स देखील प्लाझामध्ये असतील.

- जेडब्लूपीमध्ये मनीष मल्होत्रा, अबू जानी-संदीप खोसला, राहुल मिश्रा, फाल्गुनी, शेन पीकॉक आणि रितू कुमार यांसारखे प्रसिद्ध डिझायनर्सच्या शॉप देखील असणार आहे. त्यामुळं मुंबईकरांची चांगलीच सोय होणार आहे.

- रिलायन्सच्या प्लाझामध्ये नागरिकांना मल्टिप्लेक्स थिएटर, गॉरमेट फूड एम्पोरियम यांसारख्या सुविधा मिळणार आहे. जिओ वर्ल्ड प्लाझात भारतीय बाजारपेठेतील वस्तूंबरोबर विदेशी वस्तूंनाही विक्रीसाठी एकाच छताखाली आणण्याचं धोरण असल्याचं रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील बातम्या