मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jammu Kashmir encounter : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ कॅप्टनसह ४ जवान शहीद

Jammu Kashmir encounter : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ कॅप्टनसह ४ जवान शहीद

Nov 22, 2023, 06:30 PM IST

  • Jammu-Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दले व दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र

Jammu-Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दले व दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत.

  • Jammu-Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दले व दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे भारतीय लष्कर व पोलिसांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. या एनकाउंटरमध्ये लष्करातील दोन एक कॅप्टनसह चार जवान शहीद झाले आहेत तर २ जवान जखमी झाले आहेत. लष्कराच्या स्पेशल फोर्स आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहशतवादी घुसल्याची माहिती मिळताच शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांसोबत लष्कराची चकमक सुरू आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

सांगितले जात आहे की, राजौरी जिल्ह्यातील बाजी मॉल जंगलात ही चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून दोन जखमी झाले आहेत. 

घटनास्थळी दोन दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शोध मोहिमेदरम्यान धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या गोळीबारात दोन अधिकारी आणि दोन जवानांनी प्राण गमावले झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुद्धल तालुक्यातील गुलेर-बेहरोटे परिसरात सकाळी लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त  पथकाने घेराबंदी व शोधमोहीम CASO) सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली.

जम्मू येथील पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, राजौरीतील कालाकोट भागातील धरमसाल पोलीस ठाण्याच्या सोल्की गावातील बाजी माल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर घेराव घालण्यात आला. येथे दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला असून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील पीर पंजाल जंगलात मागील काही वर्षात अनेक चकमकी झडल्या असून हा भाग सुरक्षा दलांसाठी आव्हान बनला आहे. दहशतवादी येथील भौगोलिक स्थितीचा फायदा घेत लपण्यासाठी या जंगलाचा वापर करतात. मागच्या आठवड्यात राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता.

पुढील बातम्या