मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jammu Kashmir : लष्कराला मोठे यश ! बारामूला येथे चकमकीत एक दहशतवादी ठार, शोपियामध्ये मोठी कारवाई सुरू

Jammu Kashmir : लष्कराला मोठे यश ! बारामूला येथे चकमकीत एक दहशतवादी ठार, शोपियामध्ये मोठी कारवाई सुरू

Sep 30, 2022, 11:01 AM IST

    • Encounter In Jammu Kashmir : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाण्याआधी लष्कराला मोठे यश आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमकी सुरू असून ३ एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. दक्षिण कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील चित्रगाम या ठिकाणी अनाई उत्तर कश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील पट्टन येथे दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे.
Encounter In Jammu Kashmir

Encounter In Jammu Kashmir : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाण्याआधी लष्कराला मोठे यश आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमकी सुरू असून ३ एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. दक्षिण कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील चित्रगाम या ठिकाणी अनाई उत्तर कश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील पट्टन येथे दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे.

    • Encounter In Jammu Kashmir : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाण्याआधी लष्कराला मोठे यश आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमकी सुरू असून ३ एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. दक्षिण कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील चित्रगाम या ठिकाणी अनाई उत्तर कश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील पट्टन येथे दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे.

जम्मू- कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवादी ठार झाला आहे. गृह मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी बारामूला जिल्ह्यातील पट्टन परिसरात दशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीची माहिती पोलिसांनी ट्विट करून दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बारामूलाच्या येदिपोरा येथील पट्टन परिसरात चकमक सुरू आहे. पोलिस आणि सुरक्षाबल त्यांना पडण्याच्या प्रयत्नात आहेत. या परीसारत दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिस आणि सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर दहशतवादी लपले असलेल्या परिसराला घेरत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे ३ ऑक्टोबरला जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या अधिकाऱ्यांनी या बाबत माहिती दिली आहे. अमित शाह हे ३ ऑक्टोबररोजी संध्याकाळी जम्मू येथे पोहचणार आहेत. ते पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते येथील रघुनाथ मंदिरात जाणार आहेत. याच दिवशी ते राजौरी येथे भाजपाच्या एका रॅलीमध्ये संबोधित करणार आहेत. यानंतर श्रीनगर येथील कार्यक्रमासाठी ते निघणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी ते सकाळी १० वाजता बारामूला येथील पक्षाच्या कार्यक्रमात आणि एका रॅलीत सहभागी होणार आहेत.

अमित शहा हे पाहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या बाहेर रॅलीला संबोधित करणार आहेत. ते आज केंद्र शासित प्रदेशाच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर येणार होते. १ ऑक्टोबर रोजी राजौरी आणि २ ऑक्टोबर रोजी बारामूला या ठिकाणी सभा घेणार होते. जम्मू-कश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी या कार्यक्रमात बदल झाल्याची माहिती दिली.

रैना म्हणाले, गृह मंत्री कार्यालयातून एक फोन आलेला. आणि त्यांच्या बदललेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान येथे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या अंत्यविधीसाठी टोकियो येथे गेले आहे. त्यामुळे शाह यांना दिल्ली येथे राहावे लणार आहे. त्यामुळे शहा यांच्या काश्मीर दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. राजौरी आणि बारामूला येथील दौरा करणारे पोलिस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंह म्हणाले, अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी सर्व सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे.

 

विभाग

पुढील बातम्या