मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा, घुसखोरीचा कट उधळला

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा, घुसखोरीचा कट उधळला

Oct 26, 2023, 08:43 PM IST

  • Jammu and Kashmir news : कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

संग्रहित छायाचि्त्र

Jammu and Kashmir news : कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

  • Jammu and Kashmir news : कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील कुपवाड़ा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पोलीस व भारतीय सैन्य दलाच्या संयुक्त कारवाईत लष्कर ए तैयबा संघटनाच्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. जम्मू-काश्मीर पोलीस अतिरिक्त महासंचाकल विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेले दहशतवादी लष्कर -ए-तैयबा (एलईटी) चे होते.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

पोलीसांच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार,कुपवाडा पोलीसांनी दिलेल्या सूचनांच्या आधारावर माछील सेक्टरमध्ये घुसखोऱ्यांचा तपास सुरु करण्यात आला. त्यानंतर माछीलमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सुरक्षा दलाच्या जवानांनी सुरुवातीला दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची पुष्टी एडीजीपी काश्मीरने दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस व सैन्य दलाकडून घुसखोरीविरोधी कारवाया गतिमान केल्या आहेत. जे आधी केवळ भारतीय सैन्य दलाकडून ही मोहीम राबवली जात होती. बुधवारी श्रीनगर येथील १५ कोर मुख्यालयात जम्मू-काश्मीर आणि सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत काश्मीरमध्ये सीमापार दहशतवादी कारवायांवर चर्चा झाली होती.

अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षी काश्मीरमध्ये ४६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यातील ३७ दहशतवादी पाकिस्तानी होते तर केवळ ९ जण स्थानिक होते. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या ३३ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले होते की, मारल्या गेलेल्या परदेशी दहशतवाद्यांची संख्या स्थानिक दहशतवाद्यांहून चार पट अधिक आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यात १३० दहशतवादी सध्या सक्रीय असून त्यापैकी निम्मे परदेशी दहशतवादी आहे.

पुढील बातम्या