मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Israel attack Gaza : बोलिव्हियाने इस्त्रायलशी राजनैतिक संबंध तोडले; राजदूत माघारी

Israel attack Gaza : बोलिव्हियाने इस्त्रायलशी राजनैतिक संबंध तोडले; राजदूत माघारी

Nov 01, 2023, 02:22 PM IST

    • इस्त्रायलद्वारे गाझापट्टीमध्ये सुरू असलेले हल्ल्याचा निषेध करत बोलिव्हिया या देशाने इस्रायलशी अधिकृत संबंध तोडले आहेत
Israeli bombardment in Gaza (AFP)

इस्त्रायलद्वारे गाझापट्टीमध्ये सुरू असलेले हल्ल्याचा निषेध करत बोलिव्हिया या देशाने इस्रायलशी अधिकृत संबंध तोडले आहेत

    • इस्त्रायलद्वारे गाझापट्टीमध्ये सुरू असलेले हल्ल्याचा निषेध करत बोलिव्हिया या देशाने इस्रायलशी अधिकृत संबंध तोडले आहेत

इस्त्रायलद्वारे गाझापट्टीमध्ये सुरू असलेले हल्ले आणि त्यात हजारो निरपराध पॅलेस्टिनी नागरिक, मुलांच्या मृत्यूच्या घटनेचा निषेध करत बोलिव्हिया या देशाने इस्रायलशी अधिकृत संबंध तोडले आहेत. बोलिव्हियाचे उप परराष्ट्र मंत्री फ्रेडी मामानी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गाझामध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धावरून इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा करणारा बोलिव्हिया हा जगातला पहिला देश ठरला आहे. ‘गाझा पट्टीत इस्त्रायलच्या हल्‍ल्यात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक विस्थापित झाले आहेत. इस्त्रायलने हे हल्ले त्वरित थांबवावे, अशी आमची मागणी आहे’ असं फ्रेडी मामानी म्हणाल्या. बोलिव्हियाकडून गाझापट्टीतील नागरिकांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पाठवण्याची घोषणा येथील राष्ट्रपती कार्यालयाच्या मंत्री मारिया नेला प्रादा यांनी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइनही मिळणार बाजारासारखी भाजी खरेदीची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

दरम्यान, बोलिव्हियाच्या या निर्णयानंतर इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. बोलिव्हियाच्या या निर्णयाला आम्ही फारसं महत्व देत नसल्याचं सांगत या निवेदनात टीका करण्यात आलेली आहे. बोलिव्हियाने दहशतवाद आणि इराणमधील आयतुल्ला राजवटीपुढं आत्मसमर्पण केल्याचं इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. बोलिव्हियामध्ये लुईस आर्सेने राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तसेही आशयविरहित झाले होते, असंही इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. २००९ साली गाझापट्ट्यात इस्त्रायलद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करत बोलिव्हियाने इस्त्रायलसोबतचे राजनैतिक संबंध तोडले होते. त्यानंतर २००० साली संबंध पूर्ववत झाले होते.

हमासकडून बोलिव्हियाच्या निर्णयाचे स्वागत; अरब देशांना आवाहन

दरम्यान, गाझा पट्टीचं प्रशासन हाकणाऱ्या ‘हमास’ने बोलिव्हियाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शिवाय मध्य पूर्वेतील अरब राष्ट्रांनी बोलिव्हियाकडून धडा घेऊन इस्त्रायलशी संबंध तोडावे, असं आवाहन हमासने केलं आहे. मध्यपूर्वेतील यूएई, बहरिन या दोन अरब राष्ट्रांनी इस्त्रायलशी सर्वसामान्य संबंध प्रस्थापित केले असून संबंध प्रस्थापित करण्यासाठी सौदी अरेबियाची इस्त्रायलसोबत गुप्त चर्चा सुरू होती.

दरम्यान, चिली आणि कोलंबिया या अन्य दोन राष्ट्रांनी गाझा पट्टीमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूचा निषेध केला असून युद्धविराम करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही देशांनी त्यांच्या इस्त्रायलमधील राजदूतांना माघारी बोलावले आहे. लॅटिन अमेरिकेतील डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या राष्ट्रांनी पॅलेस्टिनी नागरिकांच्या वसाहतवाद विरोधी लढ्याला नेहमी सहानुभूती दाखवलेली आहे.

इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे २३ लाख लोकसंख्या असलेल्या गाझा पट्टीतील १४ लाख नागरिक विस्थापित झाले असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुढील बातम्या