मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान तुरुंगाबाहेर; कोर्टाकडून जामीन

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान तुरुंगाबाहेर; कोर्टाकडून जामीन

Aug 29, 2023, 02:39 PM IST

  • Toshakhana case: तोशाखाना प्रकरणात अटक झालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Imran khan

Toshakhana case: तोशाखाना प्रकरणात अटक झालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Toshakhana case: तोशाखाना प्रकरणात अटक झालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Imran Khan granted bail: तोशाखाना प्रकरणात अटक झालेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इमरान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद कोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. यानंतर पीटीआयकडून संविधानाचा विजय असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

तोशाखाना प्रकरणात दोषी ठरलेल्या इम्रान खानला ३ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. याशिवाय, निवडणूक आयोगाने त्यांच्यावर पाच वर्षांसाठी निवडणूक न लढविण्यास बंदी घातली होती. इम्रान खान यांनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर निर्णय देताना इस्लामाबाद कोर्टाने म्हटले आहे की, तोशाखाना प्रकरणात ट्रायल कोर्टाने इम्रान खानला दिलेली शिक्षा हा न्यायाधीशांचा पक्षपाती निर्णय होता. हा निर्णय न्यायाची चेष्टा करण्यासारखे आहे. इमरान खानला अट्टक तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, इम्रान यांची त्यांना अट्टकहून रावळपिंडीच्या आदियाला तरुगांत हलवण्यात यावे, अशी इच्छा होती. इम्रान खानच्या वकिलांनी न्यायाधीशासमोर आपले म्हणणे मांडले. या तरुंगात दिवशा माश्या आणि रात्री किडे वावरतात.

तोशाखाना हा मंत्रिमंडळाचा एक विभाग आहे, जिथे इतर देशांचे सरकार, राष्ट्रप्रमुख आणि परदेशी पाहुण्यांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू ठेवल्या जातात.नियमानुसार इतर देशांच्या प्रमुखांकडून किंवा मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवणे आवश्यक असते. २०१८ मध्ये इमरान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. अरब देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना तेथील राज्यकर्त्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यांना अनेक युरोपीय देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडून मौल्यवान भेटवस्तूही मिळाल्या, ज्या इम्रानने तोशाखान्यात जमा केल्या होत्या,पण नंतर इमरान खानने त्या तोशाखान्यातून स्वस्तात विकत घेतल्या आणि मोठ्या नफ्यात विकल्या. त्यांच्या सरकारने या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर परवानगी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या भेटवस्तू देशाच्या तिजोरीतून २.१५ कोटी रुपयांना विकत घेतल्या गेल्या आणि अधिक किंमतीने विकण्यात आल्या. यात इमरान खान यांना ५.८ कोटींचा नफा झाल्याचे सांगितले गेले. या वस्तूंमध्ये एक ग्राफ घड्याळ, कफलिंक्सची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता.

विभाग

पुढील बातम्या