मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Iran Hijab Protest : महिला पत्रकाराने हिजाब घातला नाही, इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखतीला दिला नकार

Iran Hijab Protest : महिला पत्रकाराने हिजाब घातला नाही, इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखतीला दिला नकार

Sep 23, 2022, 11:16 AM IST

    • Iran Hijab Protest: हिजाब न घातल्यानंतर अटक करण्यात आलेल्या महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर महिला संतापल्या असून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरू आहे.
महिला पत्रकाराने हिजाब घातला नाही, इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखतीला दिला नकार (फोटो - एएफपी)

Iran Hijab Protest: हिजाब न घातल्यानंतर अटक करण्यात आलेल्या महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर महिला संतापल्या असून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरू आहे.

    • Iran Hijab Protest: हिजाब न घातल्यानंतर अटक करण्यात आलेल्या महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर महिला संतापल्या असून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरू आहे.

Iran Hijab Protest : इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलन सुरू असून महिलांकडून निदर्शने केली जात आहेत. तर दुसरीकडे महिला पत्रकाराने हिजाब न घातल्यानं इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार दिला आहे. अमेरिकन महिला न्यूज अँकरनं हिजाब घालण्यास नकार दिल्यानंतर इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत न देण्याची भूमिका घेतली. महिला पत्रकार क्रिस्टीन एमनपोर यांनी असा दावा केला की, मी हिजाब घालायला नकार दिल्यानंतर इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी मुलाखतीला नकार दिला. विशेष म्हणजे मुलाखतीची पूर्ण तयारी झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा अमेरिकेतील न्यूज चॅनेलवर कार्यक्रम होता. त्यांची मुलाखत घेण्यासाठी महिला न्यूज अँकरला हिजाब घालण्याची अट होती. पण महिला न्यूज अँकरने हिजाब घालण्यासाठी नकार दिला. यामुळे मुलाखतीची तयारी झाली असतानाही इराणचे राष्ट्रपती रईसी यांनी मुलाखत देण्यास नकार दिला. यानंतर न्यूज अँकर क्रिस्टीन एमनपोर यांनी असा दावा केला की, इराणचे राष्ट्रती इब्राहिम रईसी यांची मुलाखत केवळ हिजाब घालण्याची अट पूर्ण न केल्याने घेता आली नाही.

हिजाब सक्तीवरून इराणमध्ये वातावरण तापलं आहे. हिजाबविरोधात निदर्शने सुरू आहेत. पोलिसांनी अटक केल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर इराणमधील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हिजाब न घातल्यानं महिलेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्या महिलेचा पोलिसांच्या कोठडीतच मृत्यू झाला होता. यामुळे संतापलेल्या महिलांनी हिजाबविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

इराणमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करताना महिलांनी केस कापून तसेच हिजाब जाळून निषेध नोंदवला. दरम्यान, इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर शोकही व्यक्त केला. तसंच इराणमध्ये सद्या हिजाब विरोधी आंदोलन सुरु आहे त्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "इराणमध्ये सुरु असणारे हिजाब विरोधी आंदोलन हे इराणच्या विरोधकांचा कट आहे."

विभाग

पुढील बातम्या