मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narmada River Bus Accident: इंदूर-जळगाव एसटी बस नर्मदा नदीत कोसळून १३ ठार

Narmada River Bus Accident: इंदूर-जळगाव एसटी बस नर्मदा नदीत कोसळून १३ ठार

Jul 18, 2022, 01:09 PM IST

    • MSRTC Bus fell into Narmada River: चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं प्रवाशांनी भरलेली एक बस नर्मदा नदीत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Bus Accident

MSRTC Bus fell into Narmada River: चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं प्रवाशांनी भरलेली एक बस नर्मदा नदीत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

    • MSRTC Bus fell into Narmada River: चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं प्रवाशांनी भरलेली एक बस नर्मदा नदीत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ST Bus fell into Narmada River: मध्य प्रदेशातील इंदूरहून जळगावच्या दिशेनं निघालेली एक बस धार इथं नर्मदा नदीत कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ लोकांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

ही बस जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथं निघाली होती, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. आग्रा-मुंबई महामार्गावर इंदूरपासून ८० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. मध्य प्रदेशातील धार आणि खरगोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सेतू पुलावरून ही बस नदीत कोसळली. सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व स्थानिक पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. मदत व बचावकार्य तातडीनं हाती घेण्यात आलं असून काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील व वाहक प्रकाश श्रावण चौधरी यांचाही समावेश आहे. नदीचा प्रवाह वेगवान असल्यानं मदतकार्यात अडथळे येत आहेत. इंदूर आणि धारहून एनडीआरएफचं पथकही घटनास्थळी पोहोचलं आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे स्वत: येथील मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी स्वत: या संदर्भात ट्वीट केलं आहे. अपघातग्रस्त बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. जखमींवर तातडीनं आवश्यक ते उपचार करण्याचे आदेश दिले आहेत, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. ब्रेक फेल झाल्यामुळं हा अपघात झाला असावा, असं अंदाज मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी वर्तवला आहे.

महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेश सरकारच्या संपर्कात

इंदोर-अमळनेर बश अपघाताचं वृत्त अतिशय दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आलं आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्य प्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी स्वत: धार जिल्हाधिकारी आणि एसटी प्रशासनाच्या संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगानं केलं जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पुढील बातम्या