मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indigo Airbus Deal : इंडिगो ५०० नव्या विमानांची खरेदी करणार, फ्रान्सच्या बड्या कंपनीशी झाला करार

Indigo Airbus Deal : इंडिगो ५०० नव्या विमानांची खरेदी करणार, फ्रान्सच्या बड्या कंपनीशी झाला करार

Jun 20, 2023, 09:00 AM IST

    • Indigo Airbus Order : इंडिगो कंपनीने तब्बल ५०० विमानांची नवी ऑर्डर दिली आहे. फ्रान्समधील मोठी कंपनीने ही ऑर्डर स्वीकारली आहे.
Indigo Airbus New Deal (REUTERS)

Indigo Airbus Order : इंडिगो कंपनीने तब्बल ५०० विमानांची नवी ऑर्डर दिली आहे. फ्रान्समधील मोठी कंपनीने ही ऑर्डर स्वीकारली आहे.

    • Indigo Airbus Order : इंडिगो कंपनीने तब्बल ५०० विमानांची नवी ऑर्डर दिली आहे. फ्रान्समधील मोठी कंपनीने ही ऑर्डर स्वीकारली आहे.

Indigo Airbus New Deal : भारतासह जगभरात प्रसिद्ध असलेल्या इंडिगो या हवाई वाहतूक कंपनीने तब्बल ५०० नव्या विमानांची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आली आहे. पॅरिस एअर शो मध्ये इंडिगोने विमानांची मागणी केली आहे. फ्रान्सच्या एअरबस कंपनीने इंडिगोच्या विमानांची ऑर्डर स्वीकारली असून पुढील काही वर्षांमध्ये टप्प्याटप्याने इंडिगोला ही विमानं तयार करून दिली जाणार आहे. फ्रान्सच्या एअरबस कंपनीला तब्बल ५०० विमानांची ऑर्डर देणारी इंडिगो ही पहिलीच कंपनी ठरली आहे. त्यामुळं आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो कंपनीचा दबदबा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीपेक्षा इंडिगो कंपनी देशांतर्गत वाहतुकीला जास्त प्राधान्य देत असते. वर्षभरात कोट्यवधी प्रवासी इंडिगोच्या विमानांतून प्रवास करत असतात. गेल्या काही वर्षांपासून इंडिगो सातत्याने कंपनीचा विस्तार करत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये इंडिगोने विमान वाहतूक सुरू केलेली आहे. त्यामुळं आता आगामी काळात कंपनीला आणखी विमानांची गरज भासणार आहे. त्यामुळंच इंडिगोने फ्रान्सच्या एअरबस कंपनीला तब्बल ५०० विमानांची ऑर्डर दिली आहे. इंडिगोला एअरबस कंपनीकडून ए३२०एनईओ, ए३२१एनईओ आणि ए३२१एक्सएलआर ही विमानं मिळणार आहे. इंडिगोची विमानखरेदी ही भारतीय विमान वाहतुकीसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी म्हटलं आहे.

इंडिगोने ५०० विमानं नेमक्या किती रकमेत खरेदी केली, याचा तपशील दोन्ही कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु दोन्ही कंपन्यांच्या सीईओंनी नव्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे. यापूर्वी देखील इंडिगोने ४८० विमानांची ऑर्डर दिलेली आहे. त्यानंतर आता पुन्हा ५०० नव्या विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. भारतासह जगभरातील हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात इंडिगो कंपनीने १६ वर्षांपूर्वी पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर किंगफिशर आणि एअर इंडिया यांसारख्या मोठ-मोठ्या कंपन्यांना मागे सोडत इंडिगोने हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात दबदबा निर्माण केला. त्यामुळं आता या नव्या विमानांच्या ऑर्डरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

पुढील बातम्या