मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian in Gaza : गाझात अडकली भारतीय महिला; प्रचंड जीवघेण्या संघर्षानंतर सुखरूप बाहेर पडली

Indian in Gaza : गाझात अडकली भारतीय महिला; प्रचंड जीवघेण्या संघर्षानंतर सुखरूप बाहेर पडली

Nov 14, 2023, 11:50 PM IST

    • युद्धग्रस्त गाझा पट्टीमध्ये गेले काही दिवस अडकलेल्या एका भारतीय महिला आणि तिच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना यश आले आहे.  ही महिला गाझा पट्टीतून रफाह सीमामार्गे इजिप्तमध्ये दाखल झाली आहे.
इजिप्तची राजधानी कैरो येथे भारताचे राजदूत अजित गुप्ते यांच्यासोबत लुबना नाजिर शाबू आणि तिची मुलगी करिमा शाबू (PTI)

युद्धग्रस्त गाझा पट्टीमध्ये गेले काही दिवस अडकलेल्या एका भारतीय महिला आणि तिच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना यश आले आहे. ही महिला गाझा पट्टीतून रफाह सीमामार्गे इजिप्तमध्ये दाखल झाली आहे.

    • युद्धग्रस्त गाझा पट्टीमध्ये गेले काही दिवस अडकलेल्या एका भारतीय महिला आणि तिच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना यश आले आहे.  ही महिला गाझा पट्टीतून रफाह सीमामार्गे इजिप्तमध्ये दाखल झाली आहे.

युद्धग्रस्त गाझा पट्टीमध्ये गेले काही दिवस अडकलेल्या एका भारतीय महिलेची सुखरूप सुटका करून इजिप्तमध्ये हलवण्यात आले आहे. लुबना शाबू असं या महिलेचं नाव असून तिची मुलगी करीमा हिलाही इजिप्तमध्ये सुखरूप हलवण्यात आले आहे. या दोघींनी गाझा पट्टी आणि इजिप्तदरम्यानची रफाह सीमा ओलांडून अल अरिश मार्गे कैरो शहरात दाखल झाली आहे. पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीवर सध्या इस्रायली लष्कराकडून तुफान बॉम्बवर्षाव करण्यात येतोय. परदेशी नागरिकांना गाझा पट्टी सोडण्याचे आदेश इस्रायली लष्कराने आधीच दिले होते. गाझा पट्टीतून बाहेर पडण्यासाठी गाझा- इजिप्तदरम्यानची रफाह हा एकमेव सीमामार्ग उपलब्ध असून मदतसामुग्री तसेच औषधांच्या पुरवठ्यासाठी ही सीमा गेल्या आठवड्यात इस्रायली लष्कराकडून अधूनमधून खुली करण्यात येत आहे. लुबनाने याच सीमामार्गातून गाझामधून इजिप्तमध्ये प्रवेश केला. गाझा पट्टीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत केल्याबद्दल लुबनाने इस्रायलची राजधानी तेलअवीव आणि इजिप्तची राजधानी कैरो येथील भारतीय दूतावासातील अधिकारी वर्ग तसेच पॅलेस्टाइनमधील रमल्ला शहरात स्थित भारतीय प्रतिनिधींचे आभार मानले.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

वृत्तसंस्थेला केला होता संपर्क

७ ऑक्टोबर रोजी अतिरेकी संघटना हमासने इस्त्रायलवर तुफान हल्ला चढवला होता. त्यानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर बॉम्बवर्षाव करत कारवाई सुरू केली आहे. इस्त्रायलच्या कारवाईदरम्यान हॉस्पिटल, शरणार्थी शिबिरे, शाळांवर बॉम्बहल्ले होत असल्याने अनेक निरपराध पॅलेस्टिनी नागरिक ठार होत असल्याचे गाझा प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, मूळची काश्मीर येथील रहिवासी असलेल्या लुबना या महिलेने १० ऑक्टोबर रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला फोन करून गाझा पट्टीतून बाहेर काढण्यासाठी मदतीची विनंती केली होती. त्यानुसार भारताच्या दूतावासांनी युद्धग्रस्त गाझा पट्टीत अडकलेल्या लुबनाला संपर्क केला. नंतर या दूतावास आणि मिशनमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांनी एकमेकांसोबत संपर्क करून लुबनाला रफाह सीमेमार्गे बाहेर काढण्यात यश आले.

लुबनाने घेतला 'युद्धाचा क्रूर' अनुभव…'

लुबना ही भारतीय महिला गाझा पट्टीच्या उत्तर भागात राहत होती. ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री इस्त्रायली लष्कराकडून या भागातला वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. अनेक दिवस विजेशिवाय राहिल्यानंतर गाझाच्या दक्षिण भागात जाऊन रफाह सीमेमार्गे बाहेर पडण्याचा निर्णय लुबनाने घेतला. लुबनाने ओळखीच्या लोकांसोबत कधी चालत तर कधी वाहनाने गाझाचा दक्षिण भाग गाठला होता. गाझा पट्टीत इस्त्रायली लष्कराकडून सुरू असलेल्या कारवाईचा भयावह अनुभव लुबनाने विषद केला. ‘गाझा पट्टीचा भाग खूपच छोटा आहे. गाझा पट्टी सर्व बाजुंनी बंद करण्यात आली आहे. इथून बाहेर पडण्याचे कोणतेही मार्ग उपलब्ध नाहीत. गाझा पट्टीतील नागरिक सध्या एका क्रूर आणि अमानुष युद्धाचा सामना करताएत. बॉम्ब पडताच तेथे काही सेकंदातच सर्वकाही नष्ट होतं. चोहीकडून येणारे गोळीबाराचे आवाज खूपच भीतीदायक असतात. गोळीबार आणि बॉम्बवर्षावामुळे घरं सतत हादरत असतात. तेथे अतिशय भयानक परिस्थिती आहे…’ लुबना सांगत होती.

पुढील बातम्या