मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Local Product In Railway: आता लोकल वस्तूही स्टेशनवर विकता येणार;रेल्वेचा फेरीवाल्यांसाठी मोठा निर्णय

Local Product In Railway: आता लोकल वस्तूही स्टेशनवर विकता येणार;रेल्वेचा फेरीवाल्यांसाठी मोठा निर्णय

Aug 18, 2022, 11:17 AM IST

    • Indian Railways News Update Today : स्थानिक उत्पादनांच्या विक्रींबाबत भारतीय रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे.
Indian Railways News Update Today (HT)

Indian Railways News Update Today : स्थानिक उत्पादनांच्या विक्रींबाबत भारतीय रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे.

    • Indian Railways News Update Today : स्थानिक उत्पादनांच्या विक्रींबाबत भारतीय रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे.

Local Product In Indian Railway : देशातील रेल्वे स्टेशन आणि रेल्वेगाड्यांमध्ये स्थानिक उत्पादन विक्रीला वाव देण्यासाठी आता भारतीय रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. आता फेरीवाल्यांना ज्या भागांमध्ये ज्या वस्तू प्रसिद्ध असतील त्याची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय फेरीवाल्यांना या सामानांच्या विक्रीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा भारतीय रेल्वेतर्फे देण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Attack on Israel : राफावर हल्ल्याआधी इस्लामिक संघटनेने इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; युद्ध आणखी भडकणार

Viral news: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या जेवणात मिसळत होता प्रायव्हेट पार्ट अन् करत होता लघवी! वेटरचे घाणेरडे कृत्य

Viral news : पाचवीच्या विद्यार्थ्यावर शिक्षिका करत होती बलात्कार! आईने पकडले रंगेहात! काही दिवसात होणार होते लग्न

Elon Musk : इलॉन मस्कचा भारतीयांना दणका! ३० दिवसांत १.८५ लाखांहून अधिक 'एक्स' अकाऊंट बंद! 'ही' चूक करणे टाळा

देशातील स्थानिक उत्पादनांना वाव देण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये 'एक स्टेशन एक उत्पादन' या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. याआधी फेरीवाल्यांना रेल्वेत प्रवास करून खाद्यपदार्थ किंवा इतर वस्तूंची विक्री करावी लागत होती, परंतु अशा पद्धतीनं रेल्वेत खाद्यपदार्थांची विक्री करणं अवैध तर होतंच याशिवाय अनेकदा त्याच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित होत होता.

रेल्वेत आता काय काय विकलं जाणार?

रेल्वेनं घेतलेल्या या निर्णयानंतर आता खाद्यपदार्थांसह सौदर्यप्रसाधनं, ग्रोसरीज आणि गृहिणींना घरात आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंची विक्री केली जाणार आहे. फेरीवाल्यांच्या गाड्यांमुळं किंवा इतर सामानांमुळं स्टेशनवर गर्दी होऊन नये, यासाठी भारतीय रेल्वेनं अहमदाबादेतील एका राष्ट्रीय डिझाईन संस्थेशी करार केला आहे. त्यामुळं फेरीवाल्यांना विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करण्यासासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या रेल्वेनं ज्या फेरीवाल्यांना टेंडर दिलेलं आहे, त्यांनाच अशा प्रकारे रेल्वे आणि रेल्वेस्टेशनमध्ये सामानांची विक्री करता येईल.

रेल्वेतील खाद्यपदार्थांसह इतर वस्तूंची गुणवत्ता वाढणार...

अनेकदा फेरीवाल्यांकडून रेल्वेत विकल्या जाणारे खाद्यपदार्थ किंवा इतर वस्तूंच्या गुणवत्तेचा मुद्दा अनेकदा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता केंद्रानं 'एक स्टेशन एक उत्पादन' या योजनेची अंमलबजावणी करायला सुरुवात केल्यानंतर आता रेल्वेत कोणतीही वस्तू चांगल्या क्लालिटीची आणि योग्य किंमतीत रेल्वेत प्रवास करणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

पुढील बातम्या