मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mukesh Ambani Home : मुकेश अंबानींनी दुबईत खरेदी केलं तब्बल १३५० कोटींचं घर; आहेत ‘या’ आलिशान सुविधा

Mukesh Ambani Home : मुकेश अंबानींनी दुबईत खरेदी केलं तब्बल १३५० कोटींचं घर; आहेत ‘या’ आलिशान सुविधा

Oct 19, 2022, 06:07 PM IST

    • Mukesh Ambani News Home In Dubai : काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी धाकटा मुलगा अनंतसाठी दुबईत तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता.
Mukesh Ambani News Home In Dubai (HT)

Mukesh Ambani News Home In Dubai : काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी धाकटा मुलगा अनंतसाठी दुबईत तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता.

    • Mukesh Ambani News Home In Dubai : काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी धाकटा मुलगा अनंतसाठी दुबईत तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता.

Mukesh Ambani News Home In Dubai : प्रसिद्ध उद्योगपती आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसाठी दुबईत एक बंगला खरेदी केला होता. त्यानंतर आता त्यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दुबईच्या पाम जुमेरा बेटावर १३४९ कोटी रुपयांचं आलिशान घर खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्यात या घराचा सौदा झाला असून अंबानींनी हे घर मोहम्मद अलशाया या व्यावसायिकाकडून खरेदी केल्याची माहिती आहे. त्यांची स्टारबक्स, एच अँड एम आणि व्हिक्टोरिया सीक्रेटमध्ये भागिदारी असल्याचीही माहिती एका इंग्रजी वेबसाईटनं दिली आहे. त्यामुळं आता काही महिन्यांच्याच अंतरावर अंबानींनी दुबईत दुसरं घर खरेदी केलं असून आता ते कायमचे दुबईत रहायला जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

अंबानींनी खरेदी केलेलं हे आलिशान घर मुलगा अनंत अंबानीच्या घरापासून अगदी जवळ आहे. त्यात खाजगी स्पा, इनडोअर आणि आउटडोअर पूलसह दहा बेडरूम्स आहेत. याशिवाय प्रशस्त जीम, थेटर, बॉलिंग अ‍ॅली १८ बाथरुम्स आणि १५ कार पार्क होतील इतकी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. अंबानींनी दुबईत घेतलेलं हे घर सर्वात महागडं ठरलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स कंपनीनं ७९ दशलक्ष डॉलरची रक्कम खर्च करून आयकॉनिक यूके कंट्री क्लब स्टोक पार्क विकत घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी दुबईत घरखरेदी केली आहे.

दरम्यान मुकेश अंबानींचं मुंबईतील अँटिलिया हे निवासस्थान नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेलं आहे. त्यानंतर अंबानी कुटुंब लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं. याशिवाय त्यांनी काही दिवसांपूर्वीच सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडलं आहे. त्यानंतर आता त्यांनी दुबईत एकापाठोपाठ दोन बंगले विकत घेतल्यानं ते दुबईत शिफ्ट होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

पुढील बातम्या