मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agniveer bharti: अग्निवीर योजनेत पुन्हा होणार मोठे बदल; ५० टक्के सैनिकांना करणार कायम

Agniveer bharti: अग्निवीर योजनेत पुन्हा होणार मोठे बदल; ५० टक्के सैनिकांना करणार कायम

Sep 25, 2023, 09:57 AM IST

    • Agniveer bharti yojna : सशस्त्र दलांच्या भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निवीर भरती योजनेची पहिली तुकडी लष्करात दाखल झाली आहे. दरम्यान, आता भारत सरकार या योजनेत पुन्हा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.
Agniveer bharti yojna

Agniveer bharti yojna : सशस्त्र दलांच्या भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निवीर भरती योजनेची पहिली तुकडी लष्करात दाखल झाली आहे. दरम्यान, आता भारत सरकार या योजनेत पुन्हा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.

    • Agniveer bharti yojna : सशस्त्र दलांच्या भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निवीर भरती योजनेची पहिली तुकडी लष्करात दाखल झाली आहे. दरम्यान, आता भारत सरकार या योजनेत पुन्हा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.

Indian Army Agniveer Update: भारत सरकारने सशस्त्र दलात भरती प्रक्रियेत मोठा बदल करत अग्निवीर भरती योजना सुरू केली. या योजनेला मोठा विरोध झाला होता. मात्र, हा विरोध झुगारून सरकारने ही योजना लागू केली. नौदल, हवाईदल आणि लष्करात अग्निवीरांची पहिली तुकडी दाखल झाली आहे. दरम्यान, आता लष्कर या योजनेबाबत भारतीय लष्कर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लवकरच सैन्यात कायम होणा-या सैनिकांची संख्या सरकार वाढवू शकते अशी माहिती आहे. याबाबत सरकारने सध्या अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. सध्याच्या नियमानुसार अग्निवीर योजनेंतर्गत सैन्याचा भाग बनलेल्या २५ टक्के सैनिकांना प्रशिक्षणानंतर कायम केले जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Pune Ganesh festival: भक्ताची दगडूशेठ गणपतीला अनोखी भेट; काय-काय दिलं पाहा!

अग्निवीर योजनेअंतर्गत भरती करण्यात आलेल्या तरूणांपैकी ५० टक्के तरुणांना लष्करात कायम स्वरूपी घेण्याचा संरक्षण मंत्रालय गांभीर्याने विचार करत आहे. या बाबत वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. गेल्यावर्षी ही योजना लागू करण्यात आली होती. अग्निवीर योजनेंतर्गत सैनिकांची नियुक्ती ही चार वर्षांसाठी केली जाते. त्यानंतर ७५ टक्के भरती झालेल्या सैनिकांना ठराविक रक्कम देऊन त्यांना निवृत्त केले जाणार आहे.

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना दणका! जीएसटी विभागाने केली वैद्यनाथ साखर कारखान्याची १९ कोटींची मालमत्ता जप्त

भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी अग्निवीर भरती योजना राबविण्यात आली आहे. या भरती अंतर्गत पहिली तुकडी ही तिन्ही दलात दाखल झाल्या आहेत. ही योजना लागू करण्यात आल्यावर आता या योजनेत सुधारणा करण्याच्या मानसिकतेत संरक्षण विभाग आहे. या बाबत अधिकाऱ्यांची पहिली बैठक झाली असल्याची माहिती आहे. विशेषत: नौदल आणि हवाई दलात प्रशिक्षित भरती झालेल्या अग्निवीरांच्या ७५ टक्के जवानांना चार वर्षांत निवृत्ती दिली जाणार आहे. मात्र, जेव्हा ते त्यांच्या कामात निपुण होतील तेव्हाच ते निवृत देखील होतील.

नौदल आणि हवाई दलात बहुतेक सैनिक हे तांत्रिक काम करत असतात. लष्करातही सैनिकांना अनेक विभागात तांत्रिक कामे करावी लागतात. त्यामुळे ५० टक्के भरती झालेल्या जवानांना कायम स्वरूपी करण्याच्या विचारात सरकार आहे. पहिली तुकडी भरती होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे सरकार लवकरच या बाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पुढील बातम्या