मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Women's Day: भारतीय वायुसेनेत प्रथमच महिलेच्या हातात लढाऊ हेलिकॉप्टर युनिटची धुरा

Women's Day: भारतीय वायुसेनेत प्रथमच महिलेच्या हातात लढाऊ हेलिकॉप्टर युनिटची धुरा

Mar 07, 2023, 05:02 PM IST

    • आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला सन्मान आणि समानतेच्या दृष्टिने दूरगामी परिणाम साधणारी एक चांगली बातमी भारतीय वायुसेनेने दिली आहे. (Group Captain Shaliza Dhami became first woman to command combat unit in IAF)
Group Captain Shaliza Dhami became first woman to command combat unit in IAF

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला सन्मान आणि समानतेच्या दृष्टिने दूरगामी परिणाम साधणारी एक चांगली बातमी भारतीय वायुसेनेने दिली आहे. (Group Captain Shaliza Dhami became first woman to command combat unit in IAF)

    • आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला सन्मान आणि समानतेच्या दृष्टिने दूरगामी परिणाम साधणारी एक चांगली बातमी भारतीय वायुसेनेने दिली आहे. (Group Captain Shaliza Dhami became first woman to command combat unit in IAF)

भारतीय लष्करात सर्वाधिक आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या लढाऊ तुकड्यांची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यास कणखर महिला अधिकारी सज्ज झाल्या आहेत. उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला सन्मान आणि समानतेच्या दृष्टिने दूरगामी परिणाम साधणारी एक चांगली बातमी भारतीय वायुसेनेने दिली आहे. भारतीय वायुसेनेत कार्यरत असलेल्या ग्रुप कॅप्टन शालिझा धामी यांची पश्चिम क्षेत्राच्या लढाऊ हेलिकॉप्टर युनिटची धुरा सोपवण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेत एखाद्या लढाऊ युनिटचे नेतृत्व करणाऱ्या धामी या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

ग्रुप कॅप्टन धामी या २००३ साली भारतीय वायुसेनेत दाखल झाल्या. त्या हेलिकॉप्टर पायलट म्हणून वायुसेनेत दाखल झाल्या होत्या. धामी यांच्याकडे तब्बल २८०० तास हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्याचा अनुभव आहे. धामी या पात्र फ्लाइट इन्स्ट्रक्टर असून त्यांनी वायुसेनेच्या पश्चिम कमांडमध्ये हेलिकॉप्टर युनिटच्या फ्लाइट कमांडंट म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या त्या फ्रंटलाइन कमांड मुख्यालयाच्या ऑपरेशन्स शाखेत तैनात आहे.

भारतीय लष्कराच्या महिला कॅप्टन शिवा चौहान यांची नुकतीच सियाचीनमध्ये तैनात करण्यात येत असल्याचे लष्कराने जाहीर केले होते. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये सक्रियपणे तैनात असलेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

पुढील बातम्या