मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  INDIA : संविधानाच्या पहिल्या मसुद्यात नव्हता ‘भारत’, मग कसे तयार झाले डॉ. आंबेडकर अन् झाला बदल?

INDIA : संविधानाच्या पहिल्या मसुद्यात नव्हता ‘भारत’, मग कसे तयार झाले डॉ. आंबेडकर अन् झाला बदल?

Sep 06, 2023, 02:03 PM IST

  • India bharat name debate : संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी संविधानाचा जो पहिला मसुदा तयार केला होता, त्यामध्ये भारत शब्द नव्हता. त्यानंतर अनेक वाद विवादानंतर हा शब्द घालण्यात आला.

India bharat

India bharat name debate : संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकरयांनी संविधानाचा जो पहिला मसुदा तयार केला होता, त्यामध्ये भारत शब्द नव्हता. त्यानंतर अनेक वाद विवादानंतर हा शब्द घालण्यात आला.

  • India bharat name debate : संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी संविधानाचा जो पहिला मसुदा तयार केला होता, त्यामध्ये भारत शब्द नव्हता. त्यानंतर अनेक वाद विवादानंतर हा शब्द घालण्यात आला.

देशाचे नाव इंडिया बदलून भारत करण्याच्या चर्चा जोरावर सुरू आहेत. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे भाजप सरकारचे म्हणणे आहे की, हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. भारत आणि INDIA वरून सुरू झालेला हा वाद नवा नाही.  इतकेच नाही तर भारतीय संविधान निर्मितीच्या वेळीही यावरून गरमा गरम वादविवाद झाला होता. याचे कारण होते की, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी संविधानाचा जो पहिला मसुदा तयार केला होता, त्यामध्ये भारत शब्द नव्हता. त्यांनी संविधानात केवळ INDIA नाव लिहिले होते. त्यावर अनेक सदस्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांच म्हणणे होते की, देशाचे मूळ नाव भारत आहे. त्यामुळे हे नाव संविधान नसणे चुकीचे आहे. त्यावर बराच वाद झाला व एक वर्षानंतर जेव्हा अंतिम मसुदा तयार झाला त्यावेळी भारत नावाला स्थान देण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

त्यानंतर भारतीय संविधानात लिहिले गेले की, 'इंडिया दॅट इज भारत।' इतकेच नाही तर प्रस्तावनेतही 'आम्ही भारताचे नागरिक' उल्लेख केला गेला. तर इंग्रजीमध्ये 'वी द पीपल ऑफ इंडिया' लिहिले गेले होते. अशाप्रकारे संविधानात वर्णित भारत आणि इंडियाचा अर्थ हिंदी व इंग्रजी भाषेत होता. देशाचे नाव इंडिया मानले गेले व त्याचा अर्थ हिंदीत भारत मानला गेला. याच कारणामुळे इंग्रजीला प्रोत्साहन मिळाल्याच्या विरोधात राम मनोहर लोहिया,मुलायम सिंह यादव यांच्यासारखे नेते व आरएसएस सारख्या संघटनांनी भारत व इंडियामध्ये फरक असल्याचं म्हटलं होते. 

भारत आधी न लिहिल्यामुळे भडकले होते संविधान सभेचे सदस्य -

संविधान सभेचे सदस्य एचव्ही कामत याच्याशी सहमत नव्हते. ज्या पद्धतीने भारत नावाचा समावेश केला होता, त्यांचे म्हणणे होते की, आधी भारत पाहिजे होते त्यानंतर इंग्रजीमध्ये  INDIA  पाहिजे होते. त्याचबरोबर त्यांचा सल्ला होता की, भारत नसेल तर हिंद लिहिले जावे यालाही इंग्रजीमध्ये INDIA म्हटलं जाऊ शकते. भारत नावाचा समावेश करण्याच्या बाजुने संविधान सभेतील सेठ गोविंद दास, कमलापती त्रिपाठी, के. सुब्बाराव, राम सहाय  आणि हर गोविंद पंत आदि होते. सेठ गोविंद दास यांनी म्हटले होते की, सर्व वेदांमध्ये इंडिया शब्दाचा कुठेच समावेश नाही. हा शब्द तेव्हा आला जेव्हा ग्रीक भारतात आले. त्यांनीच इंडियाचा उल्लेख केला व हा शब्द प्रचलित झाला. 

हिंदुस्तान आणि हिंदीलाही 'भारत आणि भारती' संबोधण्याचा होता प्रस्ताव -

भारत नावाच्या समर्थकांचे म्हणणे होते की, वेद, उपनिषिदे, ब्राह्मण ग्रंथ, महाभारत आणि अन्य पुराणांमध्ये भारताचा उल्लेख मिळतो. त्याचबरोबर चीनी प्रवासी ह्वेन सांग यानेही आपल्या प्रवास वर्णनात भारतच लिहिले होते. के. सुब्बाराव यांनी म्हटले होते की, सिंधु आणि इंडस नदीमुळे  INDIA  नाव समोर आले. त्यांनी असेही म्हटले की, देशाचे हिन्दुस्तान नावही पाकिस्तानच्या दाव्याला मजबुती देते. कारण आता सिंधु नदी त्यांच्या हद्दीत आहे. त्यामुळे हिंदुस्तान नावही ठेवायला नको. देशाचे नाव भारत असावे. त्याचबरोबर त्यांनी हिंदी भाषेलाही भारती संबोधण्याचा त्यांनी सल्ला  दिला.

विभाग

पुढील बातम्या