मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  INDIA आघाडीत बिघाडी! केजरीवाल यांच्यानंतर ममता बॅनर्जीही काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत

INDIA आघाडीत बिघाडी! केजरीवाल यांच्यानंतर ममता बॅनर्जीही काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत

Dec 18, 2023, 06:21 PM IST

  • India Alliance Meeting: अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील सर्व १३ जागांवर दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे तृणमूलने काँग्रेसला केवळ २ जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे.

India Alliance Meeting

India Alliance Meeting: अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील सर्व १३ जागांवर दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे तृणमूलने काँग्रेसला केवळ २ जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे.

  • India Alliance Meeting: अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील सर्व १३ जागांवर दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे तृणमूलने काँग्रेसला केवळ २ जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांच्या INDIA आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला मोठा झटका बसताना दिसत आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील सर्व १३ जागांवर उमेदवार देण्याचा दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसला केवळ २ जागा सोडण्यास तयार आहे. १९ डिसेंबर रोजी INDIA आघाडीची चौथी बैठक होणार आहे. यामध्ये ममता जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत. टीएमसी सूत्राकडून समजते की, ममता काँग्रेसला प्रस्ताव देऊ शकतात की, केवळ मालदा आणि बरहामपूर मतदारसंघ काँग्रेससाठी सोडू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, गुणपत्रिका 'अशी' पाहा ऑनलाइन!

दरम्यान याबाबत ममता बनर्जी यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ममता यांनी म्हटले की, आताच जागावाटपाबद्दल काहीच बोलू शकत नाही. १९ डिसेंबरनंतरच तुम्हाला याबाबत समजेल. टीएमसीने ज्या दोन जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामध्ये अधीर रंजन चौधरी यांचा बरहामपूर मतदारसंघ आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील या मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक ६६ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. येथून अधीर रंजन चौधरी १९९९ पासून सलग निवडून येत आहेत. 

त्याचबरोबर मालदा जिल्ह्यातील दक्षिण मालदा मतदारसंघही काँग्रेसचा गड राहिला आहे. येथून काँग्रेसचे खासदार अबू हासिम खान चौधरी निवडून येतात. ते या मतदारसंघाचे २००९ पासून प्रतिनिधित्व करत आहेत. या दोन जागा जिंकल्यामुळे टीएमसी काँग्रेसला या दोन जागा ऑफर  करू शकते. त्याचबरोबर अन्य जागांवर आपले उमेदवार देऊन समर्थन देण्याची मागणी केली जाऊ शकते. 

त्याचबरोबर तृणमूलने म्हटले होते की, काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना महत्व द्यायला हवे. ज्या राज्यात जो प्रादेशिक पक्ष मजबूत आहे, तेथे त्यांना प्राधान्याने जागा द्याव्यात. यामुळे काँग्रेसची चिंता वाढू शकते. काँग्रेससाठी केवळ दोन जागांवर निवडणूक लढणे सोपे नाही. टीएमसीच्या एका नेत्याने म्हटले की, पार्टी मीटिंगमधून समजते की, ममता बनर्जी थेट सोनिया आणि राहुल यांना सांगतील की, त्यांनी २ जागा घ्याव्यात. त्याचबरोबर मार्च-एप्रिलमध्ये राज्यसभेसाठी अभिषेक मनु सिंघवी  यांच्या समर्थनाचीही ऑफर दिली जाऊ शकते. येथून २०२८ मध्ये सिंघवी  यांनी काँग्रेसच्या  समर्थनाने विजय मिळवला होता.

पुढील बातम्या