मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Independence Day : स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर धडाडणार स्वदेशी होवित्जर तोफ; २१ तोफांची सलामी

Independence Day : स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर धडाडणार स्वदेशी होवित्जर तोफ; २१ तोफांची सलामी

Aug 11, 2022, 02:21 PM IST

    • Independence Day celebration स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावर इंग्रजांच्या २१ तोफांद्वारे सलामी दिली जात होती. मात्र, ही परंपरा आता बंद होणार आहे. ब्रिटश तोफांएवजी आता डीआरडीओने तयार केलेली स्वदेशी एटीएजीएस तोफांद्वारे राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाणार आहे.
स्वदेशी होवित्जर तोफ

Independence Day celebration स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावर इंग्रजांच्या २१ तोफांद्वारे सलामी दिली जात होती. मात्र, ही परंपरा आता बंद होणार आहे. ब्रिटश तोफांएवजी आता डीआरडीओने तयार केलेली स्वदेशी एटीएजीएस तोफांद्वारे राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाणार आहे.

    • Independence Day celebration स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावर इंग्रजांच्या २१ तोफांद्वारे सलामी दिली जात होती. मात्र, ही परंपरा आता बंद होणार आहे. ब्रिटश तोफांएवजी आता डीआरडीओने तयार केलेली स्वदेशी एटीएजीएस तोफांद्वारे राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाणार आहे.

दिल्ली : देश यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. ७५ वर्षानिमित्त या वर्षी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिवस समारोहात २१ तोफांची सलामी देण्यासाठी सरकार की 'मेक इन इंडिया' अंतर्गत स्वदेशी होवित्जर तोफ आणि एडवांस्ड टॉड आर्टिलरी गन सिस्टम (एटीएजीएस) यांच्या प्रोटोटाइपचा वापर सलामी देण्यासाठी करणार आहेत. या तोफांमुळे भारताच्या वाढलेल्या क्षमतांचे प्रदर्शन होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने या वर्षी अनेक नव्या संकल्पना अमलात आणल्या जाणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या ब्रिटिश कालीन तोफांएवजी डीआरडीओने बनवलेल्या पूर्णपणे स्वदेशी असलेल्या एटीएजीएस या तोफांद्वारे यावर्षी लाल किल्यावर २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. या संदर्भात पीटीआईने दिलेल्या वृत्तानुसार संरक्षण मंत्रालयाला या स्वदेशी तोफांचा वापर करून भारताच्या वाढलेल्या क्षमतांचे प्रदर्शन करणे हा उद्देश आहे.

अमृत महोत्सव वर्षानिमित भारत देणार एक खास संदेश

या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या समारोहानिमित्त विशेष आमंत्रणे पाठवण्यात आले आहेत. या वर्षीच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या वर्षी देशभरातून सर्व जिल्ह्यातील एनसीसीचे छात्र हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सर्व मुलांना भारताच्या भौगोलिक मानचित्रच्या फॉरमेशनमध्ये लाल किल्याच्या प्रांगणतील 'ज्ञान पथावर' बसवले जाणार आहे. यावेळी हे विद्यार्थी भारताच्या प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिकचे प्रतीक असलेले पोशाख घालून 'एक भारत श्रेष्ठ भारत' असा संदेश देणार आहेत. या सोबतच समाजात दुर्लक्षित राहिलेल्या आणि देशाच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजवण्याऱ्या अंगणवाडी सेविका, मुद्रा योजना ऋणग्राही व्यक्ति, शवगृह कार्यकर्ता या सारख्या अनेकांना यावर्षी लाल किल्यावरील मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विशेष आमंत्रणे दिली गेली आहे.

१४ देशातील मुळे राहणार उपस्थित

या वर्षी स्वातंत्र्य दिवस समारंभासाठी पहिल्यांदाच ९ से १७ ऑगस्ट दरम्यान युवा आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या साठी १४ देशातील तरूणांना आमंत्रित केले आहे. यात अमेरिका, ब्रिटेन, अर्जेंटीना, ब्राजील, फिजी, इंडोनेशिया, किर्गिस्तान, मालदीव, मॉरीशस, मोजाम्बिक, नाइजीरिया, सेशेल्स, यूएई आणि उज्बेकिस्तान असे मिळून २६ अधिकारी, पर्यवेक्षक आणि १२७ छात्र भारतात आले आहे. लालकिल्यावरील मुख्य कार्यक्रमात भाग घेण्यासोबतच हे सर्व युवक दिल्ली आणि आग्रा येथे सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणी जाणार आहेत. या १२७ मुलांची निवड ही विविध देशात राष्ट्रव्यापी स्पर्धा घेऊन करण्यात आली. यात लाखों मुलांनी सहभाग नोंदवला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे १२ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे वीर गाथा स्पर्धेतील (सुपर -२५ )२५ विजेत्यांना सम्मानित करणार आहेत.

विभाग

पुढील बातम्या