मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Income tax : तेव्हा इतक्या उत्पन्नावर द्यावा लागायचा प्राप्तीकर.. १९९२ मधील टॅक्स स्लॅबचा फोटो VIRAL

Income tax : तेव्हा इतक्या उत्पन्नावर द्यावा लागायचा प्राप्तीकर.. १९९२ मधील टॅक्स स्लॅबचा फोटो VIRAL

Feb 01, 2023, 04:59 PM IST

  • Income tax slabs in budget 1992 goes viral : सध्या सोशल मीडियावर १९९२ मधील टॅक्स स्लॅबचा फोटो व्हायरल होत आहे. त्यावेळचे करमुक्त उत्पन्न व आताचे करमुक्त उत्पन्न यात जमीन-आस्मानचा फरक दिसत आहे.

१९९२ मधील टॅक्स स्लॅबचा फोटो VIRAL

Income tax slabs in budget 1992 goes viral : सध्या सोशल मीडियावर १९९२ मधील टॅक्स स्लॅबचा फोटो व्हायरल होत आहे. त्यावेळचे करमुक्त उत्पन्न व आताचे करमुक्त उत्पन्न यात जमीन-आस्मानचा फरक दिसत आहे.

  • Income tax slabs in budget 1992 goes viral : सध्या सोशल मीडियावर १९९२ मधील टॅक्स स्लॅबचा फोटो व्हायरल होत आहे. त्यावेळचे करमुक्त उत्पन्न व आताचे करमुक्त उत्पन्न यात जमीन-आस्मानचा फरक दिसत आहे.

Income Tax Slabs in Budget 1992: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सामन्य लोकांची या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. यावेळी आठ वर्षानंतर टॅक्स स्लॅब वाढवला आहे. आता वार्षिक ७ लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. दरम्यान सोशल मीडियावर अर्थसंकल्पाबाबत मीम्सही शेअर केले जात आहे. यातच एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा फोटो१९९२ मधील अर्थसंकल्पातील नवीन इनकम टॅक्स स्लैब (Income tax slabs in budget 1992) ची आहे. यावर लोक आपली मते व्यक्त करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर काही जुनी बिले व रिसीट पाहिली असतील. जे खूप प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामध्ये मोटरसायकल, सायकल आणि सोन्यापासून हॉटेलच्या बिलांचा समावेश आहे. १९९२ मध्ये पंतप्रधान नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी टॅक्स स्लॅबला तीन भागात विभाजित केले होते.

१९९२ च्या इनकम टॅक्स स्लॅबचा हा फोटो ट्विटरवर@IndiaHistorypic नावाच्या पेजवरून ३० जानेवारी रोजी शेअर केला गेला होता. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, १९९२ च्या अर्थसंकल्पातन्यू इनकमटॅक्स स्लैब. २८ हजार रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. २८००१ ते ५०,००० रुपयांपर्यंत २० टक्के टॅक्स.५०००१ ते १,०००,०० रुपयांपर्यंत ३० टक्के टॅक्स व १ लाखाहून अधिक उत्पन्नावर ४० टक्के इनकम टॅक्स. या ट्वीटला आतापर्यंत शेकडो लाइक्सआणि अनेक रीट्वीट्स मिळाले आहेत. काही यूजरर्संनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढील बातम्या