मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan : इम्रान यांच्या अडचणीत वाढ.. अटकेनंतर आता PTI च्या अध्यक्षपदावरूनही हटवण्याचा निर्णय

Imran Khan : इम्रान यांच्या अडचणीत वाढ.. अटकेनंतर आता PTI च्या अध्यक्षपदावरूनही हटवण्याचा निर्णय

Aug 07, 2023, 08:44 PM IST

  • Imran khan : तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा  तसेच पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासही बंदी घातल्यानंतर आता  निवडणूक आयोगाने  इम्रान खान यांना आपला पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (PTI) च्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Imran khan

Imran khan : तोशाखाना प्रकरणातइम्रान खान यांनातीन वर्षांची शिक्षा तसेचपाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासही बंदी घातल्यानंतर आता निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना आपला पक्ष'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (PTI) च्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Imran khan : तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा  तसेच पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासही बंदी घातल्यानंतर आता  निवडणूक आयोगाने  इम्रान खान यांना आपला पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (PTI) च्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली– तोशाखाना प्रकरणी अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांच्याविरुद्ध आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पीटीआय पक्षाच्या प्रमुख पदावरून हटवले गेले आहे. लाहौर हायकोर्टाने तोशाखाना प्रकरणात ३ वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे. यावर्षी २१ मे रोजी न्यायालयाने इम्रान खान यांना दोषी ठरवले आहे. त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

दरम्यान आता इम्रान यांनी तोशाखाना प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर लाहौर हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. कोर्टाने इम्रान यांना निवडणूक लढवण्यासही बंदी लादली आहे. ते चार वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुल्तान राजा यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने इम्रान खान यांच्या अटकेनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, दोषी आढळल्यानंतर इम्रान खान हे 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' चे प्रमुखपद स्वीकारण्यास पात्र नाहीत, त्यामुळे निवडणूक आयोगाला आता त्यांना पदावरून बडतर्फ करण्याचा आदेश जारी करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून याचीअधिसूचना जारी केली जाणार आहे.

इम्रान खान हे शनिवारी तोशाखाना प्रकरणात दोषी आढळले आणि त्यानंतर त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्यांना तात्काळ अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.

विभाग

पुढील बातम्या