मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Heat Wave! देशातली अनेक राज्य आता अलर्टवर, हवामान विभागाने दिला 'हा' इशारा

Heat Wave! देशातली अनेक राज्य आता अलर्टवर, हवामान विभागाने दिला 'हा' इशारा

Jun 07, 2022, 11:56 AM IST

  • देशात पावसाचं आगमन होऊनही देशातल्या अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभाग देत आहे. पावसाळा तोंडावर असतानाही देशातल्या अनेक राज्यात हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहेत.

देशातल्या अनेक राज्यात उष्णतेच्या झळा (हिंदुस्तान टाइम्स)

देशात पावसाचं आगमन होऊनही देशातल्या अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभाग देत आहे. पावसाळा तोंडावर असतानाही देशातल्या अनेक राज्यात हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहेत.

  • देशात पावसाचं आगमन होऊनही देशातल्या अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभाग देत आहे. पावसाळा तोंडावर असतानाही देशातल्या अनेक राज्यात हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहेत.

एकीकडे पावसाची देशातला प्रत्येक नागरिक आतुरतेनं वाट पाहात असताना देशातल्या हवामानाने मात्र अचानक बदल केला आहे. देशात एकीकडे पूर्व मोसमी पाऊस पडला असला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाहीय. त्यामुळे देशात वातावरण थंड होण्याऐवजी जास्त तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशात आता हवामान विभागानेही ऐन पावसाळ्यात उष्णतेच्या लहरींचा देशातल्या अनेक राज्यात इशारा दिल्यानं ही राज्य आता अलर्ट मोडवर गेली आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

देशात यंदा मॉन्सूनचं आगमन लवकर होण्याची चिन्हं पाहायला मिळत होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हा मॉन्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. परिणामी देशातल्या अनेक राज्यात हिट वेव पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्रही अपवाद नाहीय. 

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार या राज्यांसह अनेक राज्यांमध्ये कडक उन पाहायला मिळतंय. त्यामुळे या राज्यांमधले नागरिक त्रस्त झाल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील विदर्भात, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात जणू आकाशातून आगीचा वर्षाव होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातल्या विदर्बात तर सूर्यनारायण आपला प्रकोप दाखवत आहे. इथं सातत्यानं तापमान ४५ ते ४७ डिग्रीच्या आसपास पाहायला मिळत आहे. मुंबईतही उकाडा कमी असला तरी आर्द्रतेनं मुंबईकरांच्या अंगाची लाही होत आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी चार ते पाच दिवस उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहील. या भागातील बहुतांश भागात पारा ४० ते ४५ अंशांच्या दरम्यान राह. मात्र, पारा वाढल्यामुळे काही ठिकाणी जोरदार वारे किंवा गडगडाटी वादळे येऊ शकतात.

खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात उष्णतेच्या लाट गंभीर स्वरुप घेऊ शकते. विदर्भ, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या वेगळ्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला असून उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; वाऱ्यासह गारांचा मारा

Weather Update: देशात उष्णता आणि पावसाचा कहर, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

हवामानाचा अंदाज...

- मुंबईत पाऊस, सिक्कीम, बंगालमध्ये जोरदार पाऊसाची शक्यता

- हवामान खात्यानुसार, कर्नाटक, अंदमान, ईशान्य भारत, तामिळनाडू, केरळ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल.

- बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

- ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे आणि केरळ, दक्षिण कर्नाटक आणि किनारी आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- केरळ, दक्षिण कोकण आणि गोव्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.

- ओडिशा, मराठवाडा आणि जम्मू-काश्मीरच्या अंतर्गत भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील बातम्या