मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka CM race: ‘ब्लॅकमेल करून काहीवेळा मुख्यमंत्रीपद मिळतंसुद्धा…’ डीके शिवकुमार असं का म्हणाले?

Karnataka CM race: ‘ब्लॅकमेल करून काहीवेळा मुख्यमंत्रीपद मिळतंसुद्धा…’ डीके शिवकुमार असं का म्हणाले?

May 16, 2023, 12:47 PM IST

  • कर्नाटकात बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं आपण बोललं नव्हतो. सर्व आमदार हे कॉंग्रेसचेच आमदार आहे. पक्षाचे हायकमांड जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असं कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले. Not using blackmail tactics, says DK Shivkumar 

Karnataka Congress President DK Shivakumar (PTI)

कर्नाटकात बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं आपण बोललं नव्हतो. सर्व आमदार हे कॉंग्रेसचेच आमदार आहे. पक्षाचे हायकमांड जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असं कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले. Not using blackmail tactics, says DK Shivkumar

  • कर्नाटकात बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं आपण बोललं नव्हतो. सर्व आमदार हे कॉंग्रेसचेच आमदार आहे. पक्षाचे हायकमांड जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असं कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले. Not using blackmail tactics, says DK Shivkumar 

कर्नाटक विधानसभेत कॉंग्रेस पक्षाला दणदणीत यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी कोण, याविषयी दिल्लीत खलबतं सुरू झाली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात असले तरी प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कर्नाटकचे सर्व वरिष्ठ नेते दिल्लीला ठाण मांडून असताना डीके शिवकुमार हे काल, सोमवारी बंगळुरूमध्येच थांबून होते. परंतु कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना फोन करून दिल्लीला चर्चा करण्यासाठी बोलवून घेतलं असल्याचं डीके शिवकुमार यांनी सांगितलं. कर्नाटकात बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं आपण बोललं नव्हतो. सर्व आमदार हे कॉंग्रेसचेच आमदार आहे. पक्षाचे हायकमांड जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असंही शिवकुमार एका टीव्ही चॅनलशी बोलताना म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

शिवकुमार म्हणाले, ‘मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्या हायकमांडने मला दिल्लीत बोलावलं आहे. मी दिल्लीला जातोय. मी माझ्या पक्षाला ब्लॅकमेल करत नाहीए. काही वेळेला ब्लॅकमेल करणाऱ्यांच्या मनासारखं होतं, हे खरय. परंतु मी पक्षाला ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. पक्षाला मी जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं आहे.’ असं शिवकुमार म्हणाले.

‘माझ्यासाठी पक्ष म्हणजेच हायकमांड आहे. आणि याप्रकारचा प्रस्ताव आम्ही सर्व आमदारांनी संमत केलेला आहे. मी एकटा संख्याबळ आणि बहुमत याबद्दल कसं काय बोलू शकतो? माझ्या एकट्याकडे असं कोणतंही संख्याबळ किंवा पाठिशी कोणतंही बहुमत नाही. मी पक्षाचा एक भाग आहे. शिवाय हायकमांडशी माझा थेट संवाद आहे’ असंही डीके शिवकुमार म्हणाले.

शिवकुमार यांच्या या ताज्या वक्तव्यामुळं कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री निवडण्यासाठी हायकमांडपुढं निर्माण झालेला तिढा काही प्रमाणात सुटण्यास मार्ग मोकळा झाल्याचे राजकीय निरीक्षकांचं मत आहे.

पुढील बातम्या