मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian youth killed in Russia: रशिया-युक्रेन युद्धात हैदराबादचा तरुण ठार; नोकरीच्या शोधात गेला अन्

Indian youth killed in Russia: रशिया-युक्रेन युद्धात हैदराबादचा तरुण ठार; नोकरीच्या शोधात गेला अन्

Mar 06, 2024, 08:44 PM IST

    • रशिया-युक्रेनविरुद्धदरम्यान सुरू असलेल्या युद्धात रशियन लष्कराकडून लढणाऱ्या हैदराबाद येथील मोहम्मद अस्फान (वय ३०) हा भारतीय तरुण ठार झाल्याचे वृत्त आहे.
This photo taken on February 22, 2024 shows a picture printout of Indian national Mohammed Asfan, seen wearing Russian military fatigues who last called family from the southern Russian city of Rostov-on-Don before being deployed amid the conflict in Ukraine, being held by his brother Mohammed Imran in Hyderabad. (AFP)

रशिया-युक्रेनविरुद्धदरम्यान सुरू असलेल्या युद्धात रशियन लष्कराकडून लढणाऱ्या हैदराबाद येथील मोहम्मद अस्फान (वय ३०) हा भारतीय तरुण ठार झाल्याचे वृत्त आहे.

    • रशिया-युक्रेनविरुद्धदरम्यान सुरू असलेल्या युद्धात रशियन लष्कराकडून लढणाऱ्या हैदराबाद येथील मोहम्मद अस्फान (वय ३०) हा भारतीय तरुण ठार झाल्याचे वृत्त आहे.

रशिया-युक्रेनदरम्यानच्या युद्धात रशियाकडून अनेक भाडोत्री सैनिकांचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. रशियामध्ये नोकरीसाठी गेलेला एक हैदराबादचा तरुण युक्रेनमध्ये ठार झाल्याचे वृत्त आहे. मोहम्मद आसफान (वय ३०) असं या तरुणाचे नाव असून तो नोकरीच्या शोधात रशियामध्ये गेला होता. परंतु तेथे त्याला नोकरीचे आमिष दाखवून रशियन सैन्यात भरती करून फसवणूक करण्यात आली होती, हे स्पष्ट झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

दरम्यान, मोहम्मद आसफान नावाच्या एका भारतीय तरुणाच्या मृत्युची दुर्दैवी माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही या तरुणाचे कुटुंबीय तसेच रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. या तरुणाचे पार्थिव भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ट्विट रशियातील भारतीय दूतावासाने केले आहे.

यापूर्वी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रशियन सैन्यात भरती होण्यासाठी भाग पाडलेल्या भारतीय तरुणांची सुटका करण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आसफानचा भाऊ इम्रान याला सोबत घेऊन रशियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता. मोहम्मद आसफानच्या कुटुंबीयांनी आसफानला रशियातून परत आणण्याची मागणी एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे केली होती. दरम्यान, एमआयएमने रशियाची राजधानी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता आसफानचा मृत्यू झाल्याचं दुतावासाने कळवलं आहे.

रशिया-युक्रेन युद्धामध्ये रशियाच्या बाजुने लढण्यासाठी भाडोत्री सैनिकांची भरती करण्यासाठी रशियाने जगभरातून बेकार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून बोलवून घेतले होते. अशाप्रकारे आमिष दाखवून रशियन सैनिय्ता भरती करण्यात आलेल्यांमध्ये एक भारतीय शेतकरी, एक एअरलाइन केटरर आणि एक पदवीधर तरुणाचा समावेश आहे. रशियाकडून युद्धात लढणाऱ्या या तरुणांची फसवणूक करण्यात आली असून भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांची सोडवणूक करावी अशी मागणी या तरुणांच्या कुटुंबीयांनी केली होती.

हैदराबादमधून नोकरीच्या शोधात रशियात गेलेला मोहम्मद आसफान या तरुणाचे त्याच्या कुटुंबीयांशी गेले दोन महिने कोणताही संपर्क झाला नव्हता. त्यापूर्वी आसफानने रशियातील रोस्तोव्ह ऑन डॉन या शहरातून कुटुंबीयांना शेवटचा फोन केला होता. आपल्याला रशियाच्या सीमेवर लढण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले होते. आसफानसोबत असलेल्या आणि रशियन सैन्यातून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या एका दुसऱ्या तरुणाने आसफानच्या कुटुंबीयांना फोन करून आसफानला गोळी लागल्याचे सांगितले होते, असं आसफानचा भाऊ इम्रान याने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले आहे. आसफान आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत होईल या आशेने हैदराबादहून रशियाला गेला होता, असं इम्रान याने सांगितले.

दरम्यान, रोजगाराच्या शोधासाठी रशियाला गेलेल्या काही भारतीय तरुणांनी रशियन लष्करासोबत भाडोत्री सैनिक म्हणून करारारावर स्वाक्षऱ्या केल्याच्या वृत्ताला नवी दिल्लीतील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला होता.

पुढील बातम्या