मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hurun India Rich List 2023 : अदानींना मागे टाकून मुकेश अंबानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय, सायरस पूनावाला तिसऱ्या स्थानी

Hurun India Rich List 2023 : अदानींना मागे टाकून मुकेश अंबानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय, सायरस पूनावाला तिसऱ्या स्थानी

Oct 10, 2023, 08:10 PM IST

  • Mukesh Ambani Richest Indian : हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ नुसार  रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

Mukesh Ambani Richest Indian

Mukesh Ambani Richest Indian : हुरुन इंडिया रिच लिस्ट२०२३ नुसार रिलायन्सइंडस्ट्रीजचेचेयरमन मुकेश अंबानीभारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

  • Mukesh Ambani Richest Indian : हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ नुसार  रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. त्याचबरोबर सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस पूनावाला या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. श्रीमंतांच्या या यादीत सायरस पूनावाला, शिव नादर यांच्याबरोबर कैवल्य वोहरा यांनी स्थान मिळवले असून  बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन या यादीतून बाहेर झाले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ नुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी गौतम अदानींना मागे टाकले आहे. २०२२ मध्ये गौतम अदानी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा ३ लाख कोटी रुपयांनी पुढे होते. आता मुकेश अंबानी यांनी हे अंतर पार करून २०२३ मध्ये ते सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांनी नेटवर्थ ८.०८ लाख कोटी रुपये आहे. 

अदानींची संपत्ती पाच पटींनी वाढली मात्र अव्वल स्थान गमावले -

६१ वर्षीय अदानी २०१९ मध्ये सहाव्या स्थानावर होते आता ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची नेटवर्थ ४.७४ लाख कोटी रुपये आहे. त्यांच्या संपत्तीत पाच पट वाढ झाली आहे. तर मागील पाच वर्षात अंबानींच्या संपत्तीत २.१ पट वाढ झाली आहे. २.७८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीने सायरस पूनावाला तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. सायरस पूनावाला यांची संपत्ती तीन पट वाढली आहे. 

एचसीएल टेकचे ७८ वर्षीय शिव नादर चौथ्या स्थानावर आहेत. मागील एका वर्षात त्यांची संपत्ती २३ टक्के वाढली आहे. झेप्टोचे संस्थापक २० वर्षीय कैवल्य वोहरा सर्वात कमी वयाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्याचबरोबर संकटात सापडलेले स्टार्टअप बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन हुरुन श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

हुरुन इंडिया श्रीमंतांची यादी २०२३ -

  1. मुकेश अंबानी -नेटवर्थ ८.०८ लाख कोटी रुपये.
  2. गौतम अदानी-नेटवर्थ ४.७४ लाख कोटी रुपये.
  3. सायरस पूनावाला -नेटवर्थ २.७८ लाख कोटी रुपये.
  4. शिव नादर -नेटवर्थ २.२८ लाख कोटी रुपये.
  5. गोपीचंद हिंदुजा -नेटवर्थ १.७६ लाख कोटी रुपये.
  6. दिलीप संघवी -नेटवर्थ १.६४ लाख कोटी रुपये.
  7. एलएन मित्तल-नेटवर्थ १.६२ लाख कोटी रुपये.
  8. राधाकिशन दमानी-नेटवर्थ १.४३ लाख कोटी रुपये.
  9. कुमार मंगलम बिर्ला -नेटवर्थ १.२५ लाख कोटी रुपये.
  10. नीरज बजाज -नेटवर्थ १.२० लाख कोटी रुपये.

पुढील बातम्या