मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  2000 Note: एकावेळी दोन हजाराच्या किती नोटा बदलवता येणार? सविस्तर माहिती

2000 Note: एकावेळी दोन हजाराच्या किती नोटा बदलवता येणार? सविस्तर माहिती

May 20, 2023, 08:40 AM IST

  • RBI Withdraw 2000 Notes: भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

₹2000 Currency Note Exchange Process (PTI)

RBI Withdraw 2000 Notes: भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

  • RBI Withdraw 2000 Notes: भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

RBI Withdraw 2000 Notes: आरबीआयने शुक्रवारी (१९ मे २०२३) मोठा निर्णय घेत दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात, असे निर्देश दिले. दरम्यान, एकावेळी दोन हजाराच्या किती नोटा बदलता येतील, हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार, एकावेळी २ हजाराच्या १० नोटा बँकेतून बदलवता येणार आहेत किंवा आपल्या खात्यात जमा करता येणार आहेत.दोन हजाराची नोट बदलवण्याची सुविधा ही रिझर्व्ह बँकेच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये येत्या २३ तारखेपासून म्हणजे मंगळपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना किवां खातेदारांना दोन हजाराची नोट बदलवण्याची किंवा जमा करण्याची प्रक्रिया ही पैसे जमा करण्याच्या सामन्या प्रक्रियेसारखीच असेल.

RBI Withdraw 2000 Notes : दोन हजारांच्या नोटा चलनातून रद्द, आयबीआयचा ऐतिहासिक निर्णय

ग्राहकांना सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा सप्टेंबर महिन्यांपर्यंत वापरता येणार आहे. सप्टेंबर महिन्यानंतर दोन हजारांच्या नोटा कुणालाही वापरता येणार नाही. तसेच नोटा बदलण्यासाठी ग्राहकांना तीन महिन्यांची मुदत आरबीआयकडून देण्यात आली आहे. त्यामुळं आता ज्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात दोन हजारांची नोटा आहेत, त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. येत्या २३ मे पासून बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विभाग

पुढील बातम्या