मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Small Savings Schemes मध्ये गुंतवणूक करताय? जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

Small Savings Schemes मध्ये गुंतवणूक करताय? जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

Feb 24, 2022, 11:56 AM IST

    • देशात सध्या लघु गुंतवणूक योजनांची चलती आहे. ग्राहकांकडून या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करतेवेळी टॅक्स (Tax) कडे दुर्लक्ष केले जाते.
Small Savings Schemes मध्ये गुंतवणूक करताय? जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी (HT_PRINT)

देशात सध्या लघु गुंतवणूक योजनांची चलती आहे. ग्राहकांकडून या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करतेवेळी टॅक्स (Tax) कडे दुर्लक्ष केले जाते.

    • देशात सध्या लघु गुंतवणूक योजनांची चलती आहे. ग्राहकांकडून या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करतेवेळी टॅक्स (Tax) कडे दुर्लक्ष केले जाते.

देशात सध्या लघु गुंतवणूक योजनांची चलती आहे. ग्राहकांकडून या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करतेवेळी टॅक्स (Tax) कडे दुर्लक्ष केले जाते. हा टॅक्स तुमचे रिटर्न कमी करतो. त्यामुळे ग्राहकांनी गुंतवणूक करतेवेळी याकडे लक्ष द्यावे की, रिटर्न वर टॅक्स परतावा (Tax Liability) अधिक नसेल.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

नवी दिल्ली-भारतातील लोक मोठ्या संख्येने स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करत आहेत. याचे मोठे कारण असे आहे की. या योजनांमध्ये गारंटीड रिटर्न (Guaranteed return) मिलतो. त्याचबरोबर अधिकतर स्मॉल सेव्हिंग स्कीम्स महागाई (Inflation) च्या तुलनेत अधिक रिटर्न देतात. मात्र ग्राहक आपला पैसा गुंतवणूक करतेवेळी टॅक्स (Tax) कडे लक्ष देत नाही आणि हा टॅक्स तुमचे रिटर्न कमी करतो. त्यामुळे ग्राहकांना गुंतवणूक करतेवेळी हे पाहिले पाहिजे की, रिटर्न वर टॅक्स दायित्व (Tax Liability) अधिक नसेल, तर आपण जाणून घेऊया वेगवेगळ्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवर टॅक्सचे काय नियम आहेत. 

1. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) पीपीएफ EEE स्टेटसच्या जवळपास असतो. म्हणजे पीपीएफमध्ये तीन स्तरांवर टॅक्स सवलत मिळते. या योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कलम 80सी अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळतो. यावर मिळणारे व्याज आणि मॅच्योरिटी वेळी काढण्यात आलेली रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. 

2. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) - सुकन्या समृद्धी योजना म्हणजे एसएसवाय ट्रिपल ई स्टेटससह असते. या योजनेत केलेली गुंतवणूक आयकर अधिनियमचे कलम 80सी अंतर्गत टॅक्स फ्री असते. त्याचबरोबर व्याज आणि मुदतीनंतर काढण्यात येणारी रक्कमही पूर्णपणे करमुक्त असते. या योजनेमध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात सुमारे 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. 

3. नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट्स (NSC) नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट्स योजनेत गुंतवणूक केल्याने आयकर अधिनियम कलम 80सी नुसार कर सवलतीची लाभ मिळतो. या योजनेत मॅच्योरिटीनंतर मिळणारे व्याज करपात्र असते. हे व्याज गुंतवणूकदारांच्या एक वार्षिक उत्पन्नाशी जोडले जाते.

4. मासिक आय योजना (MIS) पोस्ट ऑफिसच्या मासिक आय योजनेत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर आयकरमध्ये कोणतीही सवलत मिळत नाही. या योजनेत गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करपात्र असते. 

5. किसान विकास पत्र (KVP) किसान विकास पत्र म्हणजे केवीपी योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकरात कोणताही सूट मिळत नाही. या योजनेत गुंतवणुकीवर मिळणारे व्याज गुंतवणूकदाराच्या वार्षिक उत्पन्नाशी जोडले जाते. ज्यावर टॅक्स स्लॅबनुसार टॅक्सची गणना केली जाते. 

6. आरडी योजना (RD)

लघु बचत योजनांमध्ये आरडी खूप लोकप्रिय योजना आहे. प्रत्येक महिन्याला छोटी-छोटी बचत करून मोठी गुंतवणूक करण्यासाठी ही एक चांगली योजना आहे. या योजनेतून मिळणारे व्याज गुंतवणूकदाराच्या वार्षिक उत्पन्नाशी जोडले जाते, ज्यावर टॅक्स स्लॅबच्या आधारावर टॅक्स लागू केला जातो. 

7. सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS)- सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीममध्ये (वरिष्ठ नागरिक बचत योजना) जमा रक्कमेवर आयकर अधिनियम (Income Tax Act) चे कलम 80सी नुसार टॅक्स बेनिफिट मिळते. त्याचबरोबर जर एका वर्षात 50,000 रुपयांहून अधिक व्याज जमा झाले तर त्यावर टीडीएस कपात होईल. वरिष्ठ नागरिक 50,000 रुपयांपर्यंत व्याज उत्पन्नावर आयकर अधिनियम कलम 80 टीटीबी अंतर्गत सवलत मिळण्याचा दावा करू शकतात. 

8. टाइम डिपॉजिट (TD) ही योजना पोस्ट विभागाने सुरू केली आहे. पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉजिट म्हणजे टीडी योजना बँक एफडीच्या धर्तीवर काम करते. केवळ पाच वर्षे मुदतीच्या टाइम डिपॉजिट योजनेत आयकर अधिनियम कलम 80सी अंतर्गत टॅक्स सवलतीचा लाभ मिळतो. या योजनेत मिळणारा परतावा (रिटर्न) करपात्र असतो.

पुढील बातम्या