मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक! खाण माफियांची दबंगगिरी, DSPला डंपरखाली चिरडून मारले

धक्कादायक! खाण माफियांची दबंगगिरी, DSPला डंपरखाली चिरडून मारले

Jul 19, 2022, 02:37 PM IST

    • अवैध खाणकाम सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते रोखण्यासाठी गेलेल्या डीएसपींच्या अंगावर डंपर घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
खाण माफियांकडून पोलिस अधिकाऱ्याची हत्या (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

अवैध खाणकाम सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते रोखण्यासाठी गेलेल्या डीएसपींच्या अंगावर डंपर घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    • अवैध खाणकाम सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते रोखण्यासाठी गेलेल्या डीएसपींच्या अंगावर डंपर घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mining Mafia: हरयाणाचा नूह जिल्ह्यात खाण माफियांनी डीएसपीची हत्या केली आहे. डीएसपीच्या अंगावर डंपर घालून त्यांना चिरडल्याची धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या डीएसपींचे नाव सुरेंद्र सिंह बिश्नोई असं आहे. अवैध खाणकाम रोखण्यासाठी डीएसपी सुरेंद्र गेले होते. दगडांनी भरलेला अवैध ट्रक रोखत असताना डंपर ड्रायव्हरने त्यांच्या अंगावर डंपर घातला. यानंतर घटनास्थळी एसपी आणि आयजी दाखल झाले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहिम राबवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

गुरुग्रामला लागून असलेल्या नूंह जिल्ह्यातील पचगांव इथं ही घटना घडली आहे. अरावली डोंगरात अवैधरित्या खाणकाम सुरु असल्याची माहिती डीएसपी सुरेंद्र यांना मिळाली होती. ते मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पथकासह पोहोचले असता त्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये ते डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एसपी वरुण सिंगला घटनास्थळी दाखल झाले.

एसपी वरुण सिंगला यांनी सांगितले की, खाण माफियांनी डीएसपींच्या अंगावर डंपर घातला. यात डीएसपींचा जागीच मृत्यू झाला. तर डंपर चालकांसह माफिया घटनास्थळावरून फरार झाले आहेत. आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. अरावली क्षेत्रातील डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध खाणकाम केले जात आहे.

विभाग

पुढील बातम्या