मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Guru Arjan Dev ji Shaheedi Diwas 2023 : शीख गुरू अर्जुनदेव यांच्याबाबत माहिती आहेत का या गोष्टी?

Guru Arjan Dev ji Shaheedi Diwas 2023 : शीख गुरू अर्जुनदेव यांच्याबाबत माहिती आहेत का या गोष्टी?

May 23, 2023, 09:54 AM IST

  • Guru Arjan Dev ji : शीख धर्माचे पहिले असे गुरू ज्यांनी जहांगिराच्या धर्मपरिवर्तनाच्या सूचनेला अमान्य केलं आणि त्यांचा अमानुष छळ झाला. मात्र आपल्या धर्माप्रती ते निष्ठावान राहीले आणि शीख धर्मासाठी शहीद होणारे पहिले गुरू म्हणून प्रसिद्ध झाले.

गुरू अर्जुन देव (HT)

Guru Arjan Dev ji : शीख धर्माचे पहिले असे गुरू ज्यांनी जहांगिराच्या धर्मपरिवर्तनाच्या सूचनेला अमान्य केलं आणि त्यांचा अमानुष छळ झाला. मात्र आपल्या धर्माप्रती ते निष्ठावान राहीले आणि शीख धर्मासाठी शहीद होणारे पहिले गुरू म्हणून प्रसिद्ध झाले.

  • Guru Arjan Dev ji : शीख धर्माचे पहिले असे गुरू ज्यांनी जहांगिराच्या धर्मपरिवर्तनाच्या सूचनेला अमान्य केलं आणि त्यांचा अमानुष छळ झाला. मात्र आपल्या धर्माप्रती ते निष्ठावान राहीले आणि शीख धर्मासाठी शहीद होणारे पहिले गुरू म्हणून प्रसिद्ध झाले.

साल २०२३ मध्ये आज म्हणजेच २३ मे रोजी गुरु अर्जुन देव शहीद दिवस साजरा केला जात आहे. गुरू अर्जुन देव मानवतेचे खरे सेवक, धर्माचे रक्षक आणि धीर गंभीर स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. ते रात्रंदिवस लोकांची सेवा करतो. सर्व धर्मांबाबत माहिती आणि आदर असणारे गुरू म्हणूनही ते देशाला परिचित आहेत. त्यांचं हौतात्म्य हे शीख धर्माच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. आज त्यांच्या बाबतीतली काही रोचक तत्थ्य आपण जाणून घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

  • गुरु अर्जुन देव यांचा जन्म १५ एप्रिल १५६३ रोजी गोइंदवाल साहिब, तरनतारन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु रामदास आणि आईचे नाव माता भानी होते. अर्जुन देव यांचे आजोबा "गुरु अमरदास" आणि वडील "गुरु रामदास" हे शिखांचे अनुक्रमे तिसरे आणि चौथे गुरु होते.
  • लहानपणी अर्जुन देव यांची काळजी गुरू अमर दास आणि गुरु बाबा बुधाजी यांच्यासारख्या महापुरुषांनी घेतली होती. त्यांनी गुरु अमरदास यांच्याकडून गुरुमुखी शिक्षण, गोइंदवाल साहिब धर्मशाळेतून देवनागरीचे शिक्षण, पंडित बेनी यांच्याकडून संस्कृत आणि त्यांचे काका मोहरी यांच्याकडून गणिताचे शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी काका मोहन यांच्याकडून ‘ध्यान’ करण्याची पद्धतही शिकून घेतली होती.
  • साल १५८१ मध्ये, चौथे गुरु रामदास यांनी त्यांच्या जागी अर्जुन देव यांना शिखांचे पाचवे गुरु म्हणून नियुक्त केले.
  • साल १५८८मध्ये, अर्जुन देव यांनी अमृतसर तलावाच्या मध्यभागी हरमंदर साहिबची पायाभरणी केली, जी गुरु रामदासांनी बांधली होती आणि आज हेच मंदिर सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जाते. यासाठी गुरु अर्जुन देव यांनी लाहोरचे मुस्लिम संत मियां मीर यांना सध्याच्या सुवर्ण मंदिर हरमंदरच्या पायाभरणीसाठी आमंत्रित केले होते. इमारतीच्या सभोवतालचे दरवाजे हे चारही जाती आणि प्रत्येक धर्माच्या मान्यतेचे प्रतीक म्हणून पाहिले जातात. या ४०० वर्ष जुन्या मंदिराचा नकाशाही स्वतः गुरु अर्जुन देव यांनी तयार केला होता.
  • त्यांनी वर्तमान गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथाचे संकलन सुरू केले. गुरु अर्जन देव यांची ही सर्वात मौल्यवान कामगिरी आहे आणि त्यांनी ती भाई गुरदास यांच्या मदतीने साध्य केली. त्यांनी स्वतः २ हजारांपेक्षा अधिक स्तोत्रांचे योगदान दिले आणि सुखमणी साहिब बानी लिहिली. 
  • सनातनी सम्राट जहांगीरला त्याच्या साम्राज्यात शीख धर्माच्या प्रसाराचा धोका वाटत होता. त्याने गुरू अर्जन देव यांना अटक करून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा किंवा छळ करून मृत्यूला सामोरे जाण्याचा आदेश दिला. गुरू शेवटपर्यंत आपल्या श्रद्धेशी निष्ठावान राहिले.
  • गुरु अर्जुन देव हे शीख धर्माचे पहिले शहीद होते. गुरु अर्जुन देव जी यांचे पार्थिव रावी नदीत विसर्जित करण्यात आले त्या ठिकाणी गुरुद्वारा डेरा साहिब (आता पाकिस्तानमध्ये) बांधण्यात आले आहे.

विभाग

पुढील बातम्या