मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गुजरात: लाऊडस्पीकरवर आरती केल्यानं बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

गुजरात: लाऊडस्पीकरवर आरती केल्यानं बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

May 06, 2022, 09:40 AM IST

    • लाऊडस्पीकर जोरात का लावलात अशी विचारणा करत दोघांवर हल्ला करण्यात आला. यात झालेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला.
लाऊडस्पीकर (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

लाऊडस्पीकर जोरात का लावलात अशी विचारणा करत दोघांवर हल्ला करण्यात आला. यात झालेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला.

    • लाऊडस्पीकर जोरात का लावलात अशी विचारणा करत दोघांवर हल्ला करण्यात आला. यात झालेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला.

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लाऊडस्पीकरवर आरती केल्यानं व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका गावात मंदिरात लाऊडस्पीकरवर आरती वाजवल्याच्या कारणाने त्याच्याच समुदायाकडून व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लाऊडस्पीकरवरून दुसऱ्यांदा अशा प्रकारचा हिंसाचार घडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

मेहसाणातील लंघनाज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसवंतजी ठाकोर यांचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला आहे. रोजंदारीवर काम करमाऱ्या जसवंतजी यांच्या मोठ्या भावाचा जबाब नोंदवण्यात आला. याप्रकऱणी सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवानजी ठाकोर आणि विनुजी ठाकोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसवंतजी यांचे भाऊ अजित यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं त्यांनी पोलिसात तक्रार देताना सांगितले.

अजित ठाकोर म्हणाले की, "जसवंत आणि मी घराजवळ असणाऱ्या मेलाडी माता मंदिरात आरती करत होतो. तेव्हा लाऊडस्पीकरवरून आरती सुरु असताना सदाजीने लाऊडस्पीकर जोरात का वाजवत आहात असा प्रश्न विचारला. आम्ही आरती करतोय असं सांगितल्यानंतर सदाजीने आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांननी जेव्हा विरोध केला तेव्हा सदाजीने इतरांना बोलावून मारहाण केली."

हल्ला करणाऱ्यांकडे काठ्या होत्या. त्यांनी जसवंत आणि अजित यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी १० वर्षीय मुलाने त्याच्या घरी फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना ही घटना समजली असं अजितने पोलिसांना सांगितले. मारहाणीनंतर दोघांना स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं. तिथून पुढील उपचारासाठी अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. यात जसवंतचा उपचारावेळीच मृत्यू झाला, तर अजित यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.

विभाग

पुढील बातम्या