मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujrat Election : केवळ ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, वीजही मोफत; राहुल गांधींचे गुजरातमध्ये आश्वासन

Gujrat Election : केवळ ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, वीजही मोफत; राहुल गांधींचे गुजरातमध्ये आश्वासन

Sep 05, 2022, 07:55 PM IST

    • राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी आश्वासन दिले की, जर काँग्रेस सत्तेत आली तर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्याचबरोबर गुजरातच्या लोकांना ५०० रुपयांत सिलिंडर (gas cylinder) दिला जाईल.
काँग्रेसनेते राहुल गांधी

राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी आश्वासन दिले की, जरकाँग्रेस सत्तेत आली तर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्याचबरोबरगुजरातच्या लोकांना ५०० रुपयांत सिलिंडर (gas cylinder) दिला जाईल.

    • राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी आश्वासन दिले की, जर काँग्रेस सत्तेत आली तर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्याचबरोबर गुजरातच्या लोकांना ५०० रुपयांत सिलिंडर (gas cylinder) दिला जाईल.

गुजरात विधानसभेसाठी (Gujrat assembly election) यावर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा अद्याप केली नसली तरी राजकीय पक्षांनी निवडणूक अभियान सुरू केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला मोफत वीज, रुग्णालये व शाळांचे आश्वासन दिल्यानंतर राहुल गांधींनीही गुजरात मोहीम सुरू केली आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी गुजरातच्या जनतेला मोठी आश्वासने दिली आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी आश्वासन दिले की, जर काँग्रेस सत्तेत आली तर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्याचबरोबर गुजरातच्या लोकांना ५०० रुपयांत सिलिंडर (gas cylinder) दिला जाईल, तसेच ३०० युनिटपर्यंत लोकांना मोफत वीज दिली जाईल, असेही आश्वासन राहुल यांनी दिले आहे. 

अहमदाबादमधील 'परिवर्तन संकल्प रॅली'ला संबोधित करताना राहुल गांधींनी ही आश्वासने दिली आहेत. यामध्ये गुजरातमध्ये १० लाख नवीन नोकऱ्या देणे, ३ हजार  इंग्रजी माध्यमाच्या शाळांची निर्मिती, मुलींसाठी मोफत शिक्षण आदी आश्वासने देखील आहेत. गुजरातचे भाजप सरकार बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करेल, पण त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? असा सवाल करत त्यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक शेतकऱ्याचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन दिले. सध्या एक रुपयांना विकला जाणारा गॅस सिलिंडर (gas cylinder)  ५०० रुपयांना देऊ, असेही ते म्हणाले. 

सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत संपुष्टात येईल, असे ते म्हणाले. यासोबतच तरुणांना तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ताही दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.

विभाग

पुढील बातम्या