मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Railway: जेष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! रेल्वे भाड्यात पुन्हा सवलत मिळण्याची शक्यता

Indian Railway: जेष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! रेल्वे भाड्यात पुन्हा सवलत मिळण्याची शक्यता

Aug 10, 2022, 10:08 AM IST

    • railway will give concessions for senior citizens in ticket price: करोना काळात अनेक बदल रेल्वे मंत्रालयाने केले. अनेक सवलती रद्द करण्यात आल्या होत्या. या सर्व सवलती पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू आहे.
Indian Railway

railway will give concessions for senior citizens in ticket price: करोना काळात अनेक बदल रेल्वे मंत्रालयाने केले. अनेक सवलती रद्द करण्यात आल्या होत्या. या सर्व सवलती पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

    • railway will give concessions for senior citizens in ticket price: करोना काळात अनेक बदल रेल्वे मंत्रालयाने केले. अनेक सवलती रद्द करण्यात आल्या होत्या. या सर्व सवलती पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

कोरोना काळात रेल्वेतर्फे देण्यात येणाऱ्या अनेक सूट रद्द करण्यात आल्या होत्या.   रेल्वे तिकीट दरात जेष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत रेल्वेने रद्द केली होती. आता केंद्र सरकार ही सुविधा पुन्हा लागू करण्याच्या विचारात आहे. संसदेच्या स्थायी समितिने रेल्वेच्या एसी-३ आणि स्लीपर कोचच्या भाड्यात जेष्ठ नागरिकांना सूट देण्याच्या विचारात आहे. त्या बाबतचा प्रस्थाव देण्यात आला आहे. समितिने म्हटले आहे की, दीड वर्षांपूर्वी कोरोनामुळे जेष्ठ नागरिकांना देण्यात येणारी रेल्वे भाड्यातील सूट ही बंद करण्यात आली होती. ही सुविधा पुन्हा सुरू करण्याच्या विचारात सरकार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बर्ड फ्लूचे संकट! केरळनंतर उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी, प्रत्येक जिल्ह्यातील पक्षांचे नमुने तपासणार

ट्रकच्या धडकेत नोटांच्या बंडलांनी भरलेला 'छोटा हत्ती' पलटला, रस्त्यावर पसरले ७ कोटींची रक्कम

Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला

धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

रेल्वे संबंधी असलेले संसदेच्या स्थायी समितिचे अध्यक्ष राधा मोहन सिंह यांनी संसदेत सादर केलेल्या अहवालात या बाबतच उल्लेख केला आहे. समितिने म्हटले आहे की, रेल्वेने कोरोना काळात कोरोना नियमावलीचा विचार करून जेष्ठ नागरिकांना रेल्वेतिल विविध श्रेणीत दिली जाणारी सूट ही रद्द केली होती. यात ५८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना ५० टक्के आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांना ४० टक्के सूट ही रेल्वे भाड्यात दिली जात होती.

समितिने म्हटले आहे की, रेल्वे आता कोरोना संकटातून बाहेर येत आहे. सर्व बाबी या पूर्वपदावर येत आहेत. यामुळे रेल्वे तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध विभागातील सुविधा या पुन्हा लागू करण्याच्या विचारात सरकार आहे. समितिने म्हटले आहे की कोरोना काळात जेष्ठ नागरिकांना दिली जाणारी ही सेवा पुन्हा लागू करण्याच्या विचारात सरकार आहे. स्लीपर क्लास, एसी-३ मध्ये ही सुविधा बहाल केली जाऊ शकते. कोरोना काळापूर्वी जवळपास ४ कोच मध्ये य प्रकारची सुविधा ही जेष्ठ नगिरकांना मिळत होती.

रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या ४ विभागातील सुविधानसोबत, आजारी व्यक्ति आणि विद्यार्थ्याना मिळणाऱ्या ११ विभागात पुन्हा सवलत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, जेष्ठ नागरिकांना सध्या सूट देण्याच्या विचार नाही. रेल्वे जवळपास ५० पेक्षा अधिक विविध विभागात १० पासून ते १०० टक्यांपर्यंत सवलत देत आहे.

रेल्वेच्या या विभागात मिळणार सवलती

रेल्वे ही प्रधानमंत्री-राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त,जेष्ठ नागरिक, खेळाडू, कलाकार, विधवा, विद्यार्थी, मूक-बधिर, नेत्रहीन, दिव्यांग , मानसिक रोगी, चित्रपट तंत्रज्ञ, दशतवाद्यांशी लढा देताना शहीद झालेले पोलिस, लष्कर, अर्धसैनिक बलाचे जवान आणि त्यांच्या विधवा बायका आदिना रेल्वे प्रवासात भाड्यामद्धे सूट दिली जात होती. रेल्वेद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधे पैकी ८० टक्के सुट ही जेष्ठ नागरिकांना दिली जाते.

पुढील बातम्या