मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Varanasi Viral Video : एकाच बॉयफ्रेंडसाठी तरुणींमध्ये तुफान हाणामारी, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं

Varanasi Viral Video : एकाच बॉयफ्रेंडसाठी तरुणींमध्ये तुफान हाणामारी, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं

Nov 03, 2023, 04:44 PM IST

    • Varanasi Viral Video : किरकोळ कारणावरून तरुणींनी एकमेकींचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी हाणामारी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Varanasi Girls Fighting Viral Video (HT)

Varanasi Viral Video : किरकोळ कारणावरून तरुणींनी एकमेकींचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी हाणामारी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    • Varanasi Viral Video : किरकोळ कारणावरून तरुणींनी एकमेकींचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी हाणामारी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Varanasi Girls Fighting Viral Video : मुंबईतील लोकलमध्ये महिलांच्या दोन गटात मारामारी झाल्याची घटना ताजी असतानाच आता वाराणसीतून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. बॉयफ्रेंडसाठी एकाच वर्गातील दोन तरुणींनी एकमेकींना बेदम मारहाण केली आहे. माझ्या बॉयफ्रेंडला तू मेसेज कशाला केलास?, असं म्हणत कॉलेजमध्ये चालू वर्गात दोन विद्यार्थीनींनी एकमेकींच्या झिंज्या उपटत हाणामारी केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत संबंधित तरुणींची कॉलेजमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

सोशल मीडियावर 'घर के कलेश' या एक्स हँडलवरून तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील असल्याचा दावाही करण्यात आला आहे. यामध्ये एका तरुणीने दुसऱ्या मुलीच्या बॉयफ्रेंडला मेसेज केल्याने मोठा राडा झाला आहे. बॉयफ्रेंडला मेसेज केल्याच्या रागातून दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.

यावेळी वर्गातील अन्य मुलींनी भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु भांडखोर तरुणींनी कुणाचंही ऐकून न घेता एकमेकींना लाथाबुक्क्यांनी तुडवलं आहे. अखेर शिक्षक आणि प्राचार्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात यश आलं आहे. मारहाणीत दोन्ही तरुणींना किरकोळ मार लागला आहे.

एकाच बॉयफ्रेंडवरून झालेल्या हाणामारीमुळं अनेकांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. एकाच मुलासाठी इतकी मारामारी कशाला करायची?, असा सवाल काही लोकांनी विचारला आहे. तर अशा मुलींना कॉलेजमधून काढून टाकायला हवं, असंही काहींनी म्हटलं आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणींवर कुठलीही कार्यवाही झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु आता या प्रकरणामुळं महाविद्यालयातील मुली आणि तरुणी यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुढील बातम्या