मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gangrape: स्कूटी शिकणाऱ्या तरुणीला झुडुपात ओढून नेत सामूहिक बलात्कार

Gangrape: स्कूटी शिकणाऱ्या तरुणीला झुडुपात ओढून नेत सामूहिक बलात्कार

Dec 02, 2023, 02:03 PM IST

    • Ghaziabad gangrape News In Marathi: उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे सुक्टी शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Gangrape

Ghaziabad gangrape News In Marathi: उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे सुक्टी शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    • Ghaziabad gangrape News In Marathi: उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे सुक्टी शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Uttar Pradesh Ghaziabad Gangrape: गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी ठाण्याच्या हद्दीत दिल्लीच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी पीडित तरुणी मैत्रिणीसोबत स्कुटी चालवायला शिकत होती. त्यावेळी ३ नराधमांनी पीडिताला झुडपात ओढून नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत पुढील चौकशीला सुरुवात केली.

ट्रेंडिंग न्यूज

big solar storm will hit earth : पृथ्वीवर धडकणार भीषण सौर वादळ! अनेक देश बुडणार अंधारात; काय होणार परिणाम

Covishield : कोविशिल्डच्या धोक्याबद्दल एस्ट्राझेनकाने २०२१ मध्येच सांगितलं होतं, सीरमने केला खुलासा

WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही 'हे' काम

Elon Musk : अमेरिकन नागरिकांची भूमिका आलेली २०२४ची शेवटची निवडणूक! एलोन मस्क का म्हणाले असे ? वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सोनिया विहार येथे राहणारी तरुणी आणि तिची मैत्रिण ट्रॉनिका सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खेळण्यांच्या कारखान्यात काम करतात. पीडितेने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, ती गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मैत्रिणीसोबत कारखान्यातून परतत होती. त्यावेळी वाटेत तिला मित्र भेटला. तो तिला खानापूर रोडवरील एका निर्जन ठिकाणी मित्रासोबत स्कूटी शिकण्यासाठी घेऊन गेला. स्कुटी शिकत असताना ३ जण तिथे आले, यापैकी दोघांनी पीडिताच्या मैत्रिणीला आणि मित्राला पकडले. तर, एकाने तिला झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर इतर दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घरी पोहोचल्यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर पीडिताच्या कुटुबियांनी ट्रॉनिका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिने स्वत:ची तपासणी करण्यास नकार दिला. बराच वेळ आग्रह केल्यानंतर पीडितेने वैद्यकीय तपासणी करण्यास होकार दिला. पीडितेचे जबाब आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या घटनेबाबत पीडितेसोबतच तिचा मित्र आणि तिच्या मैत्रिणीचीही चौकशी करण्या आली. सुरुवातीला पीडितेच्या मित्राने आरोपीला ओळखत असल्याची कबूली दिली, त्यानंतर त्याने आपला जबाब मागे घेतला. तरुणाने असेही सांगितले की, तिन्ही आरोपी एका ऑटोतून घटनास्थळी आले होते. ऑटोचालक तिन्ही आरोपींना खाली उतरवून निघून गेला. पीडित तरुणी आणि तिच्या मित्रांच्या जबाबात विरोधाभास समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेचा पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.

विभाग

पुढील बातम्या