मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मालकामुळे अडचणीत आला जर्मन शेफर्ड, ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजीमुळे पोलिस वैतागले

मालकामुळे अडचणीत आला जर्मन शेफर्ड, ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजीमुळे पोलिस वैतागले

Jul 19, 2022, 02:55 PM IST

    • मालकाच्या गाडीत दारुच्या महागड्या बाटल्या सापडल्याने अटक केलीय. तर त्याच्यासोबत असलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यालाही पोलिसांनी पोलिस स्टेशनला नेलं आहे.
पोलिस ठाण्यात असलेला हा जर्मन शेफर्ड आता चर्चेचा विषय ठरला आहे. (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

मालकाच्या गाडीत दारुच्या महागड्या बाटल्या सापडल्याने अटक केलीय. तर त्याच्यासोबत असलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यालाही पोलिसांनी पोलिस स्टेशनला नेलं आहे.

    • मालकाच्या गाडीत दारुच्या महागड्या बाटल्या सापडल्याने अटक केलीय. तर त्याच्यासोबत असलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यालाही पोलिसांनी पोलिस स्टेशनला नेलं आहे.

बिहारमध्ये एक विचित्र असा प्रकार समोर आला आहे. दारुबंदी कायद्याअंतर्गत दोघांना अटक केली आहे. दोघांना ज्या गाडीतून अटक केली त्या गाडीत एका जर्मन शेफर्ड कुत्राही होता. पोलिसांनी त्या जर्मन शेफर्ड कुत्र्याला सोबत पोलिस स्टेशनला आणलं. आता अडचण अशी झालीय की कुत्र्याला फक्त इंग्रजीत बोललेलं समजतं. हिंदी किंवा इतर स्थानिक भाषेत त्याला काही सांगितलं तर ते समजत नाही. यामुळे पोलिसांच्या अडचणीही वाढल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

जर्मन शेफर्डला बक्सरच्या मुफस्सिल पोलिस ठाण्यात गेल्या १२ दिवसांपासून ठेवलं आहे. पोलिसही त्याची विशेष काळजी घेत आहेत. पोलिस कर्मचारीच त्याला दूध आणि कॉर्नफ्लेक्स खायला देत आहेत. मात्र जर्मन शेफर्ड असलेल्या या कुत्र्याला फक्त इंग्रजी समजते आणि त्यामुळे त्याला सांभाळत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची अडचण होते. तर दुसरीकडे पोलिस स्टेशनमध्ये जर्मन शेफर्ड दिसत असल्यानं परिसरातही चर्चेचा विषय बनला आहे.

जर्मन शेफर्ड कुत्रा त्याचा मालक सतिश कुमार आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या गाझीपूर इथून लक्झरी कारमधून बिहारच्या बक्सरला पोहोचला होता. तिथे सीमा तपासणी नाक्यावर गाडीत अनेक महागड्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या गेल्या. तर सतिश कुमार आणि भुवनेश्वर कुमार हे दारुच्या नशेत होते. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आणि कुत्र्यालासुद्धा पोलिस स्टेशनला आणलं. तेव्हापासून हा जर्मन शेफर्ड पाहुणा बनून मालकाच्या चुकीची शिक्षा भोगत आहे.

विभाग

पुढील बातम्या