मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gandhi Jayanti: गांधी जयंती विषयावर दमदार भाषण, ऐकून सगळेच वाजवतील टाळ्या

Gandhi Jayanti: गांधी जयंती विषयावर दमदार भाषण, ऐकून सगळेच वाजवतील टाळ्या

Oct 02, 2023, 08:16 AM IST

  • Gandhi Jayanti Speech In Marathi: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.

Mahatma Gandhi

Gandhi Jayanti Speech In Marathi: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.

  • Gandhi Jayanti Speech In Marathi: २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.

Gandhi Jayanti 2023: देशात दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे केवळ भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात कोणत्याही व्यक्तीला महात्मा गांधींची ओळख पटवून देण्याची गरज नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महात्मा गांधी यांचा वाढदिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' म्हणून देखील साजरा केला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त बहुतेक ठिकाणी भाषणे आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शाळेत किंवा महाविद्यालयात विद्यार्थी महात्मा गांधी या विषयावर भाषण करतात. महात्मा गांधीच्या १५४ व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना खालील दमदार भाषण पाठ करून सगळ्यांवर आपली छाप सोडता येईल.

Sonia Gandhi Health: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती अस्वास्थामुळे केले भरती

आदरणीय शिक्षक, मुख्यधापक आणि माझ्या मित्रांनो...

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. अहिंसक पद्धतींने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

गांधीजींनी त्यांचे शिक्षण ब्रिटीशशासित भारतात पूर्ण केले. यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केल्यानंतर ते १९१५ मध्ये भारतात परतले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग बनले. उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे बळ वाढवले. त्यांनी चंपारण सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या महत्त्वाच्या चळवळींचे नेतृत्व केले. ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढताना महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबूनही ध्येय गाठता येते हे सिद्ध केले.

गांधीजींचा मद्यपानाला विरोध दर्शवला. धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये, सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे, महिलांचा आदर केला पाहिजे, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, असा गांधीजींचा हेतू होता. गांधीजींनी भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध सातत्याने आवाज उठवला. हरिजनांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले. हरिजनांना समाजात समान दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

गांधी जयंतीनिमित्त बापूंच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी मुख्य कार्यक्रम दिल्लीतील राजघाटावर होतो. राजघाट हे गांधीजींचे समाधी स्थळ आहे. गांधी जयंतीला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर नेते राजघाटावर येऊन गांधीजींना पुष्पांजली वाहतात.

मित्रांनो, महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच संघर्ष केला नाही तर भारताला आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला. त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि भविष्यातही राहतील.भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेऊन आपण भारताच्या स्वच्छता मोहिमेला बळ देऊ शकतो. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी घर, परिसर, बाजारपेठ, रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपला परिसर स्वच्छ ठेवून आपण ते यशस्वी करू शकतो. स्वच्छतेसाठी श्रमदान ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. 1 ऑक्टोबर रोजी सरकारने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी 'एक तारीख, एक तास, एक एकत्र' मोहीम सुरू केली. पण स्वच्छतेचा समावेश आपण सवयीप्रमाणे करायला हवा. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे. ही मोहीम केवळ एक-दोन दिवसांची नसून ती सतत जीवनाचा भाग बनवली पाहिजे. घर, परिसर, बाजारपेठ, रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आता मला माझे भाषण संपवायचे आहे. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!!!

विभाग

पुढील बातम्या