मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  G20 Virtual Summit 2023 : पंतप्रधान मोदींनी G-20 व्हर्च्युल समिटमध्ये डीपफेकबाबत व्यक्त केली चिंता, म्हणाले..

G20 Virtual Summit 2023 : पंतप्रधान मोदींनी G-20 व्हर्च्युल समिटमध्ये डीपफेकबाबत व्यक्त केली चिंता, म्हणाले..

Nov 22, 2023, 11:14 PM IST

  • PM Modi In G20 Virtual Summit :  जी-२० व्हर्च्युल समिटमध्ये मोदींनी डीपफेकचा मुद्दा उपस्थित करताना याच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली. तसेच याच्या वापरावर निर्बंध आणण्याचे आवाहन जागतिक नेत्यांना केलं.

नरेंद्र मोदी

PM Modi In G20 Virtual Summit : जी-२० व्हर्च्युल समिटमध्ये मोदींनी डीपफेकचा मुद्दा उपस्थित करताना याच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली. तसेच याच्या वापरावर निर्बंध आणण्याचे आवाहन जागतिक नेत्यांना केलं.

  • PM Modi In G20 Virtual Summit :  जी-२० व्हर्च्युल समिटमध्ये मोदींनी डीपफेकचा मुद्दा उपस्थित करताना याच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली. तसेच याच्या वापरावर निर्बंध आणण्याचे आवाहन जागतिक नेत्यांना केलं.

PM Modi Speech In G20 Virtual Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजG20 व्हर्च्युल समिटमध्ये संबोधन करताना सध्या खळबळ उडवून दिलेल्या डीपफेक तंत्रज्ञानासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. आज झालेल्या व्हर्च्युल समिटमध्ये मोदींनी आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचे (AI) स्वागत केले, पण AI च्या चुकीच्या वापराबाबत चिंताही व्यक्त केली. तसेच, याच्या वापरावर निर्बंध आणण्याचे आवाहनही जगभरातील नेत्यांना त्यांनी यावेळी केले आहे. याबरोबरच मोदींनी पश्चिम आशियातील अस्थिरता आणि ग्लोबल साउथ या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडले.

ट्रेंडिंग न्यूज

Covishield आणि Covaxinनं वाढवलं नवं टेंशन! वैयक्तिक माहितीवर सायबर चोरटे डल्ला मारण्याची शक्यता

Medicine Price News : मोठी बातमी! डायबेटीस, हृदयविकार, इन्फेक्शनसह विविध आजारांवरील ४१ औषधं स्वस्त होणार

न्यायालयाने दखल घेताच ईडी पीएमएलए अंतर्गत आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Fact Check : गुरुद्वारातील लंगरमध्ये पंतप्रधान मोदी रिकाम्या भांड्यातून जेवण वाढत होते? हे खरं आहे का?

मोदींनी आपल्या भाषणात डीपफेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा गैरवापर समाजासाठी विष असल्याचं म्हटलं. आम्हाला यावर आणखी काम करावे लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सामाजिक सुरक्षिततेच्या भावनेने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आज जगात विविध आव्हाने आहेत आणि त्यांच्याशी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी हा आमचा परस्पर विश्वास आहे, जो आम्हाला एकमेकांशी जोडून ठेवतो.

मोदी म्हणाले की, आजच्या एआयच्या जमान्यात कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करणे गरजेचे आहे. डीपफेक समाजासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी किती धोकादायक आहे, याचे गांभीर्य समजून पुढे जावे लागेल. जगभरात AI च्या नकारात्मक वापरामुळे चिंता वाढली आहे. याबाबत भारताची स्पष्टभूमिकाआहे की, एआयबाबतवैश्विक नियमावली ठरवावी लागेल व त्यातआपल्याला मिळून काम करायला हवं.

आमची इच्छा आहे की AI  लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, पण ते समाजासाठी सुरक्षितही असायला हवं. याच उद्देश्याने भारतात पुढील महिन्यात ग्लोबल एआयसमिट पार्टनरशीपचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढील बातम्या