मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ५० विमाने दिल्लीत लँड न होता आकाशातूनच फिरली माघारी… कारण काय?

५० विमाने दिल्लीत लँड न होता आकाशातूनच फिरली माघारी… कारण काय?

Dec 29, 2023, 06:19 PM IST

  • गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली विमानतळावरून अनेक विमाने लँड न होताच परत जात असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिकदृष्ट्या धुक्याचं कारण पुढे केलं जात असलं तरी विमाने माघारी फिरण्यामागे वेगळंच कारण पुढे आले आहे.

Dense fog at Delhi Airport (File picture) (AFP)

गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली विमानतळावरून अनेक विमाने लँड न होताच परत जात असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिकदृष्ट्या धुक्याचं कारण पुढे केलं जात असलं तरी विमाने माघारी फिरण्यामागे वेगळंच कारण पुढे आले आहे.

  • गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली विमानतळावरून अनेक विमाने लँड न होताच परत जात असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिकदृष्ट्या धुक्याचं कारण पुढे केलं जात असलं तरी विमाने माघारी फिरण्यामागे वेगळंच कारण पुढे आले आहे.

दिल्ली विमानतळावर गेल्या काही दिवसांत एक वेगळं चित्र होतं. देश-विदेशातून विविध शहरांमधून इथं आलेली विमानं बराच वेळ आकाशात घिरट्या घालून धावपट्टीवर न उतरताच माघारी फिरायची… अशाप्रकारे एक, दोन नव्हे तर गेल्या चार दिवसांत तब्बल पन्नास विमाने हवेतूनच माघारी फिरल्याने हजारो विमान प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळं वातावरणात धुकं पसरल्याने दिल्ली विमानतळावरची दृष्यमानता खालावली होती. परिणामी अनेक पायलट्सना खाली विमानतळावरील धावपट्टी दिसत नसल्याने विमानं माघारी फिरत असल्याचं कारण सांगण्यात येत होतं. परंतु दिल्ली विमानतळाकडून प्राप्त झालेली आकडेवारी पाहिल्यास विमाने माघारी फिरण्यामागे धुक्याचं कारण पुढे केलं जात असलं तरी वेगळंच कारण पुढे आले आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार वातावरणात दाट धुके पसरले असताना देखील विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे अलगद उतरवता येतं आणि नेमके याचे प्रशिक्षण नसलेले पायलट् विमान चालवत असल्याने तब्बल ५० फ्लाइट्स परत गेल्याचं स्पष्ट  झालं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

उपलब्ध आकडेवारीनुसार २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून गुरुवार २८ डिसेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ५८ पैकी ५० उड्डाणे वळवण्यात आली होती. या विमानांमध्ये अत्यंत खराब दृश्यमानतेमध्ये उतरण्यासाठी प्रशिक्षित वैमानिकांची नियुक्ती केलेली नाही, हे कारण पुढे आलं आहे. इंडिगोची सर्वाधिक १० विमाने माघारी फिरली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल एअर इंडिया आणि स्पाइस जेटची प्रत्येकी १० विमाने माघारी फिरली होती. विस्तारा एअर कंपनीची ५, आकासा एअर कंपनीची ३ आणि अलायन एअरच्या दोन विमाने धावपट्टीवर न उतरताच माघारी गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 

एवढेच नव्हे तर खराब दृश्यमानतेत विमान उतरण्याचे प्रशिक्षण नसलेले पायलट असल्याने व्हिएतजेट, मालिंडो एअर, फ्लाय दुबई, एअर एशिया, इथिओपियन एअरलाइन्ससारख्या परदेशी विमान कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान माघारी फिरल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लँडीगच्यावेळी दाट धुक्यात पायलटला मदत करणारी CAT III यंत्रणा

CAT III ही एक इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम असून (Instrument Landing System (ILS) या यंत्रणेद्वारे  पाऊस, दाट धुके किंवा बर्फवृष्टीसारख्या अगदी दृश्यमानता ५० मीटर असताना देखील विमान उतरवता येते. 

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिल्लीत १० डिसेंबर २०२३ ते १० फेब्रुवारी २०२४ हा दाट धुक्याचा कालावधी जाहीर केला होता. शिवाय CAT 3- इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम ऑपरेशन्ससाठी रात्री ९ ते सकाळी १० ही वेळ निश्चित केलेली आहे.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘नेटवर्क थॉट्स’ या एव्हिएशन कन्सल्टन्सी फर्मचे संस्थापक अमेय जोशी म्हणाले, ‘विमानकंपन्या आणि विमानतळ यांनी प्रवाशांसोबतस पारदर्शक असणे गरजेचे आहे. प्रवाशांसोबत संवाद साधून अर्ध्याहून अधिक समस्या कमी होण्यास मदत होईल. शिवाय एअरलाइन्सकडे किती टक्के वैमानिक CAT 3B प्रशिक्षित आहेत, हे जाहीर करावे. म्हणजे धुक्याच्या काळात प्रवाशांना त्यांची विमान तिकिट बुक करण्यास त्यांना मदत होईल' असं जोशी यांनी सांगितलं.

पुढील बातम्या