मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  jammu kashmir : काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; 'ऑपरेशन काली' अंतर्गत सुरक्षा दलांना दुसरे मोठे यश

jammu kashmir : काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; 'ऑपरेशन काली' अंतर्गत सुरक्षा दलांना दुसरे मोठे यश

Nov 17, 2023, 02:47 PM IST

    • Five terrorists killed in jammu kashmir kulgam area : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांचा ठार केले आहे. गुरुवारपासून ही चकमक सुरू असून मृत दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते.
Five terrorists killed in jammu kashmir

Five terrorists killed in jammu kashmir kulgam area : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांचा ठार केले आहे. गुरुवारपासून ही चकमक सुरू असून मृत दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते.

    • Five terrorists killed in jammu kashmir kulgam area : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांचा ठार केले आहे. गुरुवारपासून ही चकमक सुरू असून मृत दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते.

Five terrorists killed in jammu kashmir kulgam area : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये गुरुवार पासून दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मृत दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते. गुरुवारी दुपारी ही चकमक सुरू झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. डीएच पोरा भागातील सामनो भागात ही चकमक सुरू असून या संयुक्त कारवाईत राष्ट्रीय रायफल्स, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांचा समावेश होता. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Dua Lipa : वर्ल्डकप फायनलची रंगत वाढणार, दुआ लिपा भारतात येणार, अहमदाबादेत रंगणार शानदार सोहळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घुसखोरीच्या प्रयत्ना दरम्यान हे दहशतवादी मारले गेले. याआधी बुधवारी सुरक्षा दलांनी उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन काली' सुरू केले असून या कारवाईत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बशीर अहमद मलिकसह दोन जण ठार झाल्याची माहिती लष्कराने दिली. ठार मारण्यात आलेले हे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत होते.

काश्मीर पोलिसांनी या बाबत ट्विट केले आहे. 'कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने ५ दहशतवाद्यांना ठार केले आहे. त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात आहे. सध्या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराचे छावणीत रुपांतर केले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, अंधार झाल्याने ही कारवाई रात्री काही काळ थांबवण्यात आली.

Pune Crime News: संतापजक ! पुण्यात कोंढवा येथे नमाज पाठणासाठी गेलेल्या ९ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

सुरक्षा दलांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी गोळीबार सुरू असताना दहशतवादी तळ ठोकून असलेल्या घरात आग लागली. घराला आग लागल्यानंतर दहशतवाद्यांना बाहेर पडावे लागले आणि सुरक्षा दलांनी त्यांचा ठार मारले. १३ सप्टेंबर रोजी अनंतनागमधील गरोल येथे झालेल्या चकमकीत तीन अधिकाऱ्यांसह चार जवान शहीद झाले होते. या मोठ्या घटनेनंतर लष्कर आणि पोलिसांनी मिळून कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत दक्षिण काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करून घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. ऑपरेशन काली अंतर्गत, १५ नोव्हेंबर रोजी उरी सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

पुढील बातम्या