मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Terrorist Attack: पूंछमध्ये भारतीय लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद

Terrorist Attack: पूंछमध्ये भारतीय लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद

Dec 22, 2023, 05:57 AM IST

    • Poonch Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात काल दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले.
Terror Attack

Poonch Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात काल दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले.

    • Poonch Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात काल दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले.

Five Soldiers Killed in Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात दुपारी चार वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी भारतीय लष्काराच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकल्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला. पाकिस्तान समर्थित पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चकमक सुरु होती. दहशतवाद्यांना घटनास्थळावरून पळ काढता येऊ नये म्हणून परिसरात नाकेबंदी करण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

मिळालेल्या माहितीनुसार, ४८ राष्ट्रीय रायफल्सची दोन वाहने बाफलियाज येथून डेरा गलीकडे जात होती. यात एक जिप्सी आणि दुसरा ट्रक होता. राजौरी-थन्नामंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी येथे भारतीय जवानांचे वाहन पोहोचताच दहशतवाद्यांनी प्रथम ग्रेनेड फेकले. यानंतर दोन्ही वाहने थांबताच चार ते सहा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. घटनास्थळावरून भीषण दृश्ये समोर आली आहेत. दोन्ही लष्करी वाहनांच्या तुटलेल्या काचा विखुरल्याचे फोटोमध्ये दिसत आहे, संपूर्ण परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले.

दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात नाईक बिरेंद्र सिंह (१५ गढवाल रायफल), नाईक करण कुमार (एएससी), रायफलमॅन चंदन कुमार (८९ आर्म्ड रेजिमेंट), रायफलमॅन गौतम कुमार (८९ सशस्त्र रेजिमेंट) आणि अन्य एक सैनिक शहीद झाले. लष्कराने शहिद झालेल्या पाचव्या जवानाचे नाव अद्याप जाहीर केले नाही.

पूंछमध्ये 26 महिन्यांत दहशतवादी हल्ल्याची ही चौथी मोठी घटना आहे. दरम्यान, २०२१ पासून या चार घटनांमध्ये २१ जवान शहीद झाले आहेत.

११ ऑक्टोबर २०२१: चामरेड भागात शोध मोहीम राबवणाऱ्या सैनिकांवर हल्ला, जेसीओसह पाच जण शहीद.

२० ऑक्टोबर २०२१: भटादुरियांमध्ये शोध मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते.

२० एप्रिल २०२३: भटादुरियांमध्ये लष्करी वाहनावर पहिला ग्रेनेड हल्ला आणि त्यानंतर गोळीबार, पाच जवान शहीद.

२१ डिसेंबर २०२३: सावनी येथे झालेल्या हल्ल्यात पाच शहीद, दोन जखमी.

विभाग

पुढील बातम्या