मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : येत्या १ -२ तासांत कर्नाटक जनतेला दिलेली ५ आश्वासने पूर्ण होणार, शपथविधी सोहळ्यातच राहुल गांधींची घोषणा

Rahul Gandhi : येत्या १ -२ तासांत कर्नाटक जनतेला दिलेली ५ आश्वासने पूर्ण होणार, शपथविधी सोहळ्यातच राहुल गांधींची घोषणा

May 20, 2023, 03:50 PM IST

  • Rahul Gandhi : राहुल गांधींनी घोषणा केली की, निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसने जी पाच आश्वासने दिली होती, ती येत्या १ ते २ तासात म्हणजे महिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण केली जातील.

Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधींनी घोषणा केली की, निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसने जी पाच आश्वासने दिली होती, ती येत्या १ ते २ तासात म्हणजे महिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण केली जातील.

  • Rahul Gandhi : राहुल गांधींनी घोषणा केली की, निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसने जी पाच आश्वासने दिली होती, ती येत्या १ ते २ तासात म्हणजे महिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण केली जातील.

कर्नाटकमध्ये आज सिद्धारमय्या यांनी मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर आठ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या शपथविधी कार्यक्रमानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला संबोधत केले. त्यांनी घोषणा केली की, निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसने जी पाच आश्वासने दिली होती, ती येत्या १ ते २ तासात म्हणजे महिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण केली जातील. त्याचबरोबर त्यांनी आपल्या 'भारत जोडो यात्रेचा' उल्लेख करताना म्हटले की, आम्ही द्वेषासा संपवले आहे. द्वेषाच्या बाजारात कर्नाटकने प्रेमांची दुकाने उघडली आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही काँग्रेसला समर्थन दिलं आहे. गेल्या पाच वर्षांत तुम्ही कोणती संकट झेलली आहेत हे आम्हाला माहित आहे. कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर माध्यमातून खूप लिहिलं गेलं की ही निवडणूक काँग्रेस का जिंकली, रॅली झाल्या, थिएरी चालू केल्या वगैरे. पण या विजयाचं एकच कारण आहे, ते म्हणजे काँग्रेस पक्ष गरीब, कमजोर, दलित, आदिवासींसोबत उभा राहिला. आमच्याकडे सत्य आणि गरीब लोक होते. भाजपाकडे धन, दौलत, शक्ती, पोलीस सगळं काही होतं. त्यांच्या पूर्ण ताकदीला कर्नाटकच्या जनतेने हरवलं, त्यांच्या भ्रष्टाचाराला हरवलं. त्यांच्या द्वेषाला हरवलं आहे.

राहुल म्हणाले निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही खोटी आश्वासने जनतेला देत नाही.  आम्ही जे  बोलतो ते करून दाखवतो. एक-दोन तासांत कर्नाटकात पहिल्या कॅबिनेटची मिटिंग होईल. या कॅबिनेटमध्ये आम्ही दिलेली आश्वासने कायदे बनतील. शेतकरी, कामगार, लहान दुकानदार, त्याचं संरक्षण करणं आणि भविष्य चमकावणे हे सरकारचं लक्ष्य आहे. आम्ही तु्म्हला स्वच्छ,  भ्रष्टाचारमुक्त  सरकार देऊ. हे सरकार कर्नाटकच्या जनतेचं सरकार आहे, आपलं सरकार आहे. आणि आम्ही मनापासून काम करू, असं आश्वासनही राहुल गांधींनी दिलं आहे.

पुढील बातम्या