मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दूध द्यायचं बंद होताच गाई मोकाट सोडणाऱ्यांवर होणार कारवाई, योगी सरकारचा निर्णय

दूध द्यायचं बंद होताच गाई मोकाट सोडणाऱ्यांवर होणार कारवाई, योगी सरकारचा निर्णय

May 30, 2022, 09:47 PM IST

    • दूध देणं बंद केलेल्या गायींना बेवारस सोडणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत.
दूध न देणाऱ्या गाई मोकाट सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल होणार गुन्हा (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

दूध देणं बंद केलेल्या गायींना बेवारस सोडणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत.

    • दूध देणं बंद केलेल्या गायींना बेवारस सोडणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत.

मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांना आळा घालण्यासाठी योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दूध देणं बंद केलेल्या गायींना बेवारस सोडणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी सांगितले की, अशा शेतकऱ्यांविरोधात पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

मंत्री धर्मपाल सिंह यांनी म्हटले की, "कसाई आणि शेतकऱ्यात फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ कसायांची नाही. आपल्या प्राण्यांना सोडणाऱ्यांवर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल." समजावादी पक्षाचे आमदार अवधेश प्रसाद यांच्याकडून विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.

अवधेश प्रसाद यांनी मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांच्या त्रासाबद्दल प्रश्न उपस्थित करताना योजना आणि त्यामुळे मृत्यू झालेल्या लोकांना नुकसान भरपाईचे काय असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितलं की, "मोकाट असलेले प्राणी पाळीव नाहीत तर त्यांना सोडण्यात आलं आहे. प्रत्येकाला माहिती आहे की त्यांना कोणी सोडलं आहे. जेव्हा एखादी गाय दूध देते तोपर्यंत तिला ठेवलं जातं आणि जेव्हा दूध द्यायचं बंद करते तेव्हा सोडण्यात येतं."

योगी सरकारने सांगितलं की, "१५ मेपर्यंत ६ हजार १८७ गाईंसाठी केंद्रांची उभारणी शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात आली आहे. यात ८ लाख ३८ हजार प्राण्यांना ठेवण्यात आलं आहे. राज्यात मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे." विधासनभा निवडणुकीवेळी विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तेव्हा मोदींनी आश्वासन दिलं होतं की राज्यात दुसऱ्यांदा सरकार आल्यास यावर उपाय शोधण्यात येईल.

पुढील बातम्या