मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Firing in Russia : रशियामध्ये शाळेत अंदाधूंद गोळीबार.. १३ जणांचा मृत्यू, हल्लेखोराची आत्महत्या

Firing in Russia : रशियामध्ये शाळेत अंदाधूंद गोळीबार.. १३ जणांचा मृत्यू, हल्लेखोराची आत्महत्या

Sep 26, 2022, 04:57 PM IST

    • रशियाच्या एका शाळेत गोळाबार (Firing in Russia) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कमीत कमी १३ लोकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
रशियामध्ये शाळेत अंदाधूंद गोळीबार

रशियाच्या एका शाळेतगोळाबार (Firing in Russia) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कमीत कमी १३ लोकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

    • रशियाच्या एका शाळेत गोळाबार (Firing in Russia) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कमीत कमी १३ लोकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

रशियाच्या एका शाळेत गोळाबार (Firing in Russia) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कमीत कमी १३ लोकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सांगितले जात आहे की, मृतांमध्ये सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वृत्तसंस्था एपीच्या नुसारएजेव्स्क शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान गर्व्हनर व स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने स्वत:ही गोळी मारून आत्महत्या केली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

येथील गव्हर्नर अलेक्जेंडर ब्रेशालोव यांनी म्हटले आहे की, शाळेत पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. मागील वर्षी मॉस्को शहरातही अशीच घटना घडली होती. येथे १९ वर्षीय तरणाने केलेल्या फायरिंगमध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ७ मुलांचा समावेश होता. गृह मंत्रालयानुसार एका शिक्षकासह काही मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृत मुलांच्या वयाची माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार जेव्हा हल्ला झाला त्यावेळी शाळेत कोणताही सुरक्षा रक्षक नव्हता. अशा प्रकारच्या घटना अमेरिकेत अनेक वेळा घडल्या आहेत. बंदूक बाळगण्याच्या नियमांत सूट देण्याच्या कारणामुळे अनेक वेळी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एजन्सीचे म्हणणे आहे की, या हिसेंमागे घरगुती वाद कारण असू शकतो. रशियामध्ये सध्या सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन केले जात आहे. यूक्रेन युद्धाच्या दरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जमावबंदीची घोषणा केल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक देश सोडून जात आहेत. तसेच रशियात लोकाकडून निर्देशने होत आहे.

विभाग

पुढील बातम्या