मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीची धाड, जप्त केले २० कोटी रुपये

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीची धाड, जप्त केले २० कोटी रुपये

Jul 23, 2022, 08:15 AM IST

    • उच्च न्यायालयाने सीबीआयला क, ड वर्गातील कर्मचारी भरती तसंच शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा तपास सुरू होता.
पश्चिम बंगालमध्ये ईडीने जप्त केले २० कोटी रुपये (फोटो - एएनआय)

उच्च न्यायालयाने सीबीआयला क, ड वर्गातील कर्मचारी भरती तसंच शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा तपास सुरू होता.

    • उच्च न्यायालयाने सीबीआयला क, ड वर्गातील कर्मचारी भरती तसंच शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा तपास सुरू होता.

ED Seized 20 cr: ईडीने शुक्रवारी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chatarjee) यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी (Arpita Mukharjee) यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. यात जवळपास २० कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ह्या पैशांचा एसएससी घोटाळ्याशी संबंध असल्याची शंका ईडीने व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche accident : 'आमची मुलगी तर निघून गेली, तिला असं बदनाम करू नका', मृत्यू झालेल्या अश्विनीची आई संतापली

नात्याला काळिमा! ज्याला मुलगा म्हणून सांभाळलं, त्याच्याशीच ठेवले लैंगिक संबंध, नातं तोडताच मारली गोळी

IMD on Monsoon : मोसमी पाऊस केरळमध्ये कधी धडकणार? हवामान विभागानं दिली महत्त्वाची माहिती

Viral News : वडिलांना साप चावल्याने मृत्यू! मुलीचे त्यांना जिवंत करण्यासाठी भर रुग्णालयात सुरू केले मंत्र पठण

नोटा मोजण्याच्या मशिनच्या माध्यमातून रोख रक्कम मोजण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. ईडीने म्हटले की, अर्पिता मुखर्जी यांच्याकडून २० पेक्षा अधिक फोन जप्त कऱण्यात आले आहेत. त्या फोनचा वापर कशासाठी केला जात होता त्याचा शोध घेतला जात आहे. ईडीने चॅटर्जी यांच्याशिवाय राज्याचे शिक्षण राज्य मंत्री परेश सी अधिकारी, आमदार माणिक भट्टाचार्य आणि इतरांच्या कार्यालयांवर धाड टाकली.

अर्पिता या पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी आहेत. त्यामुळे हे पैसे एसएससी घोटाळ्यातून कमावले असल्याचा संशय आहे. या घोटाळ्याशी संबंधित लोकांच्या अनेक ठिकाणांवर ईडीने धाड टाकली आहे. यात काही आक्षेपार्ह कागदपत्रे, संशयास्पद कंपन्यांची माहिती, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, परकीय चलन आणि सोनेही जप्त करण्यात आले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने नुकतंच रिट याचिकांमध्ये सीबीआयला क आणि ड गटातील कर्मचारी, नववी ते १२ वीचे सहायक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांच्या भरती घोटाळ्याची चौकशी करम्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी ईडी आता मनी लॉड्रिंगचा तपास करत आहे.

विभाग

पुढील बातम्या