मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sonia Gandhi : सोनिया गांधींची २ तास ईडी चौकशी, २५ जुलैला पुन्हा बोलावले..

Sonia Gandhi : सोनिया गांधींची २ तास ईडी चौकशी, २५ जुलैला पुन्हा बोलावले..

Jul 21, 2022, 04:47 PM IST

    • सोनिया गांधींची आज दोन तासांहूनही कमी काळ चौकशी झाली. त्यानंतर पहिल्या दिवसाची चौकशी संपली. प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधींची आज पुन्हा चौकशी केली जाणार नाही.
सोनिया गांधीं

सोनिया गांधींची आज दोन तासांहूनही कमी काळ चौकशी झाली. त्यानंतर पहिल्या दिवसाची चौकशी संपली. प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधींची आज पुन्हा चौकशी केली जाणार नाही.

    • सोनिया गांधींची आज दोन तासांहूनही कमी काळ चौकशी झाली. त्यानंतर पहिल्या दिवसाची चौकशी संपली. प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधींची आज पुन्हा चौकशी केली जाणार नाही.

Sonia Gandhi Ed questioning : सोनिया गांधींची आज दोन तासांहूनही कमी काळ चौकशी झाली. त्यानंतर पहिल्या दिवसाची चौकशी संपली.  प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधींची आज पुन्हा चौकशी केली जाणार नाही. सध्या ईडीने कोणतेही नवीन समन्स जारी केलेले नाही. दुसरीकडे सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. मल्लिकार्जुन खर्गे, शशि थरूर यांच्यासह काँग्रेसच्या ७५ खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात चौकशीसाठी सकाळी ईडी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी व काँग्रेस महासचिव प्रियंका गांधीही ईडी कार्यालयात आल्या होत्या. सोनिया गांधी आपल्यासोबत औषधेही घेऊन आल्या होत्या. चौकशीवेळी  प्रियंका आणि सोनिया गांधी एकाच खोलीत उपस्थित होत्या. 

मोनिका शर्मा यांनी केली सोनियांची चौकशी -


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची चौकशी करण्याची जबाबदारी महिला अधिकारी  मोनिका शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मोनिका ईडीमध्ये अडिशनल डायरेक्टर पदावर आहेत. ७५ वर्षीय सोनिया गांधी आजारी असल्याने त्यांच्यासाठी ईडी कार्यालयात रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली होती. सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे प्रियंका गांधींनाही कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. 

सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या.  ईडीने सोनिया गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड (National Herald) प्रकरणी समन्स बजावले होते. याआधी त्या कोरोनामुळे ईडीच्या (ED) चौकशीसाठी पोहचू शकल्या नव्हत्या. मात्र, आता त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेल्या असून देशभरात काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते याविरोधात आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांनीसुद्धा सयुंक्तपणे मोदी सरकारवर टीका केली आहे.

विरोधी पक्षांनी म्हटलं की, मोदी सरकारकडून विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे. केंद्रीय तपास संस्थांचा चुकीचा वापर करून टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर केला. मोदी सरकारने राजकीय विरोधकांविरुद्ध मोहिम उघडली आहे. यासाठी ते वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना टार्गेट करत आहेत. यासाठी तपास संस्थांचा दुरुपयोग केला जात आहे. लोकांविरोधात असलेल्या मोदी सरकार विरुद्ध विरोधी पक्षांची लढाई आणखी आक्रमक होईल असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे.

विभाग

पुढील बातम्या