मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Money Laundering Case : राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ED कडून अटक

Money Laundering Case : राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ED कडून अटक

Sep 07, 2022, 12:19 AM IST

    •  ईडीने मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे.
रवी नारायण यांनाEDकडून अटक

ईडीने मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे.

    •  ईडीने मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे.

ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) (Nationl Stock Exchange) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवी नारायण यांना कथित अवैध फोन टॅपिंग, एनएसई कर्मचाऱ्यांची हेरगिरी  करणे आणि मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात अटक केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

रवी नारायण एप्रिल १९९४ ते ३१ मार्च २०१३ पर्यंत एनएसईचे एमडी आणि सीईओ होते. त्यानंतर त्यांना १ एप्रिल २०१३ ते १ जून २०१७ पर्यंत कंपनीच्या कार्यकारी बोर्डात गैर-कार्यकारी श्रेणीत उपाध्यक्षपदी नियुक्त केले गेले होते. 

यापूर्वी एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने ६ मार्च रोजी को-लोकेशन घोटाळ्यात मे २०१८ रोजी एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. ईडीने त्यांना १४ जुलै रोजी फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती. 

कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन गुन्हेगारी प्रकरणांचा सीबीआयकडून समांतर तपास सुरू होता. यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांचा सहभाग आहे का? याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत होता. यानंतर अखेर आज ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत फोन टॅपिंग प्रकरणात रवी नारायण यांना अटक केल्याची माहिती समजत आहे.

विभाग

पुढील बातम्या