मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सावधान.. २ वर्षात तब्बल ४०० वेळा भूकंपाने हादरली धरती, भीतीने लोक घराबाहेर लागले झोपू

सावधान.. २ वर्षात तब्बल ४०० वेळा भूकंपाने हादरली धरती, भीतीने लोक घराबाहेर लागले झोपू

Feb 27, 2023, 08:02 PM IST

  • Earthquake in Gujarat : गुजरातच्या अमरेली जिल्ह्याला दोन वर्षात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसले असून तेथे दोन वर्षात सुमारे ४०० सौम्य हादरे नोंदवले गेले आहेत.

Earthquake in Gujarat

Earthquake in Gujarat : गुजरातच्या अमरेली जिल्ह्याला दोन वर्षात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसलेअसून तेथे दोन वर्षातसुमारे४००सौम्य हादरे नोंदवले गेले आहेत.

  • Earthquake in Gujarat : गुजरातच्या अमरेली जिल्ह्याला दोन वर्षात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसले असून तेथे दोन वर्षात सुमारे ४०० सौम्य हादरे नोंदवले गेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात वारंवार भूकंप होत असल्याने नागरिक दहशतीत आले आहेत. गुजरातच्या अमरेली जिल्ह्याला दोन वर्षात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसले असून तेथे दोन वर्षात सुमारे ४०० सौम्य हादरे नोंदवले गेले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरेलीतील मितियाला गावातही हे धक्के जाणवले, जिथे मोठ्या भूकंपामुळे कोणतीही अनुचित घटना टाळता यावी यासाठी खबरदारी म्हणून रहिवाशांनी घराबाहेर झोपायला सुरुवात केली आहे.

मितियाला येथील रहिवासी मोहम्मद राठोड यांनी सांगितले की, भूकंपाच्या भीतीने सरपंचासह गावातील बहुतेक लोक रात्री घराबाहेर झोपू लागले आहेत. तुर्कस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या विनाशकारी भूकंपात ४५ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जानेवारी २००१ मध्ये गुजरातच्या कच्छमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात १९,८०० लोकांचा मृत्यू झाला तर १.६७ लाख लोक जखमी झाले होते.

सौराष्ट्र प्रदेशात असलेल्या अमरेली जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचे कारण स्पष्ट करताना गांधीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजिकल रिसर्चचे महासंचालक सुमेर चोप्रा म्हणाले की, २३ फेब्रुवारी रोजी अमरेलीच्या सावरकुंडला आणि खंबा तालुक्यात ४८ तासांत ३.१ ते ३.४ रिश्टर स्केलचे चार धक्के बसले. त्यामुळे येथील लोक चिंतेत आहेत.

त्यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्ष आणि दोन महिन्यांत, अमरेलीमध्ये ४०० सौम्य भूकंपाची नोंद केली आहे, त्यापैकी ८६ टक्के भूकंपाची तीव्रता दोनपेक्षा कमी होती, तर १३ टक्के भूकंपाची तीव्रता दोन ते तीन इतकी होती.

विभाग

पुढील बातम्या