मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  senthilkumar : हिंदी भाषिक राज्ये ही गोमूत्र राज्ये, दक्षिणेत भाजपला स्थान नाही; लोकसभेत DMK खासदाराचे वादग्रस्त बोल

senthilkumar : हिंदी भाषिक राज्ये ही गोमूत्र राज्ये, दक्षिणेत भाजपला स्थान नाही; लोकसभेत DMK खासदाराचे वादग्रस्त बोल

Dec 06, 2023, 05:53 AM IST

  • Gaumutra States : तीन राज्यातील भाजपच्या दणदणीत विजयावर तामिळनाडूच्या या खासदाराने म्हटले की, भाजपची ताकत हिंदी पट्ट्यातच आहे. ज्याला आम्ही गौमूत्र राज्य म्हणतो.

Dmk mp dnv senthilkumar s

Gaumutra States : तीन राज्यातील भाजपच्या दणदणीत विजयावर तामिळनाडूच्या या खासदाराने म्हटले की, भाजपचीताकतहिंदी पट्ट्यातच आहे. ज्याला आम्हीगौमूत्र राज्यम्हणतो.

  • Gaumutra States : तीन राज्यातील भाजपच्या दणदणीत विजयावर तामिळनाडूच्या या खासदाराने म्हटले की, भाजपची ताकत हिंदी पट्ट्यातच आहे. ज्याला आम्ही गौमूत्र राज्य म्हणतो.

डीएमके खासदार सेंथिल कुमार एस. यांनी भाजपच्या तीन राज्यातील विजयाबद्दल लोकसभेत वादग्रस्त टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, भाजपची ताकद मुख्यत्वे हिंदी भाषिक पट्ट्यात विजय मिळवण्यात आहे. या राज्यांना आम्हीगोमूत्र राज्यम्हणतो. भाजप दक्षिण भारतात शिरकाव करू शकत नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

डीएमके खासदाराच्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसने हात वर करत म्हणले की, आम्हा सर्वांना गो मातेला मानतो. आमहाला त्यात आस्था आहे. डीएमके खासदाराच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही.

संसदेचे हिवाळी अधिवेशनाची सुरुवात जोरदार गदारोळाने झाली. मंगळवारी सभागृहात द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पार्टीचे खासदार सेंथिल कुमारयांच्या गोमूत्र विधानावर वाद निर्माण झाला. तीन राज्यातील भाजपच्या दणदणीत विजयावर तामिळनाडूच्या या खासदाराने म्हटले की, भाजपची ताकत हिंदी पट्ट्यातच आहे. ज्याला आम्ही गौमूत्र राज्यम्हणतो. भाजप कधीही दक्षिण भारतात येऊ शकणार नाही.

भाजप दक्षिणेत विजय मिळवू शकत नाही. त्यामुळे काश्मीरप्रमाणे भाजप दक्षिण भारतातील राज्यांना देखील केंद्र शासित प्रदेश बनविण्याचा धोका आहे. कारण ते तिथे जिंकू शकत नाहीत, परंतू ही राज्ये केंद्राच्या ताब्यात घेऊन राज्यपालांमार्फत शासन करू शकतात, असा आरोप सेंथिल यांनी केला.

दरम्यान सेंथिल यांच्या या वक्तव्याचा भाजपकडून निषेध करण्यात येत आहे.हा सनातन परंपरेचा अपमान आहे. डीएमकेला लवकरच गोमुत्राच्या फायद्याची माहिती होईल. देशाची जनता हे सहन करणार नाही, असे केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे.

पुढील बातम्या