मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manish Sisodia: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेची शक्यता; 'आप' रस्त्यावर

Manish Sisodia: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेची शक्यता; 'आप' रस्त्यावर

Oct 17, 2022, 10:45 AM IST

    • Manish Sisodia: सीबीआय मुख्यालयात जाण्याआधी मनिष सिसोदिया यांचे पत्नीने औक्षण केले. तर आईने बसंती चोला देत आशीर्वाद दिले. याशिवाय बर्फी देऊन तोंडही गोड केले.
मनिष सिसोदिया

Manish Sisodia: सीबीआय मुख्यालयात जाण्याआधी मनिष सिसोदिया यांचे पत्नीने औक्षण केले. तर आईने बसंती चोला देत आशीर्वाद दिले. याशिवाय बर्फी देऊन तोंडही गोड केले.

    • Manish Sisodia: सीबीआय मुख्यालयात जाण्याआधी मनिष सिसोदिया यांचे पत्नीने औक्षण केले. तर आईने बसंती चोला देत आशीर्वाद दिले. याशिवाय बर्फी देऊन तोंडही गोड केले.

Manish Sisodia: दिल्लीतील कथित दारु घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात बोलावण्यात आलं आहे. यावेळी मनिष सिसोदिया यांच्यासह आपने शक्तीप्रदर्शन केलं. सिसोदिया यांनी घरातून निघण्याआधी आईचा आशीर्वाद घेतला, त्यानंतर रोड शो करत सीबीआय मुख्यालयाकडे गेले. यावेळी क्रांतीची गाणी गात हातात तिरंगासुद्धा घेतला होता. सिसोदिया यांच्या अटकेची शक्यता असून आम आदमी पार्टीने यातून राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसला घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

घरातून निघताना सिसोदिया यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले तर आईने 'बसंती चोला' देत आशीर्वाद दिले. तसंच तोंड गोड करण्यासाठी बर्फीही दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्र सोडले. गुजरातमध्ये भाजप सरकारचा पराभव होत आहे आणि आम आदमी पार्टी जिंकत आहे. गुजरात निवडणुकीमुळे त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मी प्रामाणिकपणे काम करत आहे, भगत सिंह यांच्या मार्गाने जात आम्ही शाळा आणि रुग्णालये उभारली. प्रामाणिकपणे काम केलं. भाजप गुजरातला वाचवू शकणार नाहीत असं सिसोदिया यांनी सांगितलं. अटक होऊ शकते का असं विचारलं असता सिसोदिया म्हणाले की, "याची तयारी सुरु आहे."

पुढील बातम्या