मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  स्मृती इराणींच्या मुलीबद्दलचे ट्वीट हटवा, दिल्ली हायकोर्टाचे काँग्रेसला आदेश

स्मृती इराणींच्या मुलीबद्दलचे ट्वीट हटवा, दिल्ली हायकोर्टाचे काँग्रेसला आदेश

Jul 29, 2022, 01:52 PM IST

    • काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर आरोप करणारे ट्विट केले होते. याविरोधात स्मृती इराणी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (फोटो - पीटीआय)

काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर आरोप करणारे ट्विट केले होते. याविरोधात स्मृती इराणी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

    • काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर आरोप करणारे ट्विट केले होते. याविरोधात स्मृती इराणी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाने स्मृती इराणींच्या (Smriti Irani) मुलीबाबत केलेल ट्विट डिलिट करण्याचे आदेश काँग्रेस नेत्यांना दिले आहेत. काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर आरोप करणारे ट्विट केले होते. ते हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या दीवाणी खटल्यावर सुनावणीवेळी काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि डिसूजा यांना नोटीस बजावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

काँग्रेसच्या काही नेत्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर अवैध बार चालवत असल्याचा आरोप केला होता. स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले होते. माझी मुलगी १८ वर्षांची आहे, ती राजकारण करत नाही. एक कॉलेजची विद्यार्थीनी आहे. ती बार चालवत नाही असं स्मृती इराणी यांनी सांगितलं होतं.

स्मृती इराणी यांनी मानहानीचा दावा दाखल करताना या प्रकरणी २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने ट्विटस हटवण्यास सांगितले असून असे न केल्यास सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने संबंधित ट्विट्स डिलिट करावेत असंही न्यायालयाने सांगितलं आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने पवन खेरा यांना बार लायसनसंदर्भात करण्यात आलेले ट्विट तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच या प्रकरणी पुढची सुनावणी १८ ऑगस्टला होणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यांनी दाखल केलेल्या या तक्रारीच्या प्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयाने तिन्ही नेत्यांना पुढच्या सुनावणीला उत्तरासह हजर राहण्यास सांगितले आहे.

स्मृती इराणींनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की, काँग्रेसने एका माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे माझ्या मुलीवर आरोप केले आहेत. मात्र ज्या आरटीआयचा आधार घेतला जातोय त्यात माझ्या मुलीचं नाव नाही असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं. अमेठीत गांधी कुटुंबाला त्यांचा पराभव पचनी पडलेला नाही. त्यामुळेच असे आरोप केले जात आहेत असं म्हणत आपण न्यायालयात जाऊ असा इशारा स्मृती इराणी यांनी दिला होता.

 

विभाग

पुढील बातम्या