मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cyclone Michaung : मिचाँग चक्रीवादळाचा तामिळनाडू-आंध्राला तडाखा! मुसळधार पावसाने विमानतळ बंद, रेल्वे गाड्या रद्द

Cyclone Michaung : मिचाँग चक्रीवादळाचा तामिळनाडू-आंध्राला तडाखा! मुसळधार पावसाने विमानतळ बंद, रेल्वे गाड्या रद्द

Dec 04, 2023, 07:04 PM IST

  • Chennai Heavy Rains : चेन्नई शहराला आज मिचाँग चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे तामिळनाडूतील अनेक शहरांना जोरदार पावसाने झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले असून अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत

Tamil nadu Heavy Rains

Chennai Heavy Rains : चेन्नई शहराला आज मिचाँग चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे तामिळनाडूतील अनेक शहरांना जोरदार पावसाने झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले असून अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत

  • Chennai Heavy Rains : चेन्नई शहराला आज मिचाँग चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे तामिळनाडूतील अनेक शहरांना जोरदार पावसाने झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले असून अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत

मिचाँग चक्रीवादळ (Cyclone Michaung) तामिळनाडू किनारपट्टीजवळ आल्याने चेन्नईमधील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. वेगवान वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. कांचीपुरमध्येही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे रुप आले. रस्त्यावर पार्क केलेल्या कार गाड्या होड्यांप्रमाणे पाण्यावर तरंगताना दिसत होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या पथकाने पीरकनकरनई आणि पेरुंगलथुरजवळ पाण्यात अडकलेल्या १५ लोकांना सुखरुप बचावले. चक्रीवादळ मिचाँग उद्या (मंगळवारी) नेल्लोर आणि मछलीपट्टनम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यावेळी ८०-९० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. चेन्नई आणि लगतच्या कांचीपुरम, चेंगलपेट आणि तिरुवल्लूरच्या अनेक भागांमध्ये पूर आला असून रस्त्यावरील पाणी काढण्यासाठी सरकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत..

मुसळधार पावसाने चेन्नईमधील बहुतांश भाग पाण्याखाली गेले. सखल भागात पाणी साचले. चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत नेल्लोर आणि मछलीपट्टनमला धडकण्याची शक्यता आहे. चेन्नई शहर व शेजारच्या जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. अज सकाळी साडे पाच वाजेपर्यंत २४ तासात मीनांबक्कममध्ये १९६ मिमीआणि नुंगमबक्कममध्ये १५४.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Indian Railway:चेन्नई सेंट्रलवरून सुटणाऱ्या ६ रेल्वे गाड्या रद्द –

दक्षिण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बी. गुगनेशनयांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये धोक्याच्या पातळीवरून पाणी वाहत आहेत. या कारणामुळे बेसिन ब्रिज आणि व्यासरपाडी दरम्यानपुल नंबर १४ बंद करण्यात आले आहे. यामुळे ४ डिसेंबर रोजी डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रलहून सुटणाऱ्या सहा ट्रेन-म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस, कोयंबटूर कोवई एक्सप्रेस, कोयंबटूर शताब्दी एक्सप्रेस, केएसआर बेंगळूरु एसी डबल डेकर एक्सप्रेस, केएसआर बेंगळूरु बृंदावन एक्सप्रेस, तिरुपती सप्तगिरी एक्सप्रेस आदि रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. पूर्व किनार पट्टीवरील रेलवे (ईसीओआर) ने पाऊस व वादळाची शक्यता पाहून ५४ गाड्यांचे परिचालन रद्द केले आहे.  पुढच्या सूचनेपर्यंत मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

चेन्नई विमानतळ रात्री ११ वाजेपर्यंत बंद -
पाणी साचल्यामुळे १४ सबवे बंद करण्यात आले आहे. यामुळे विमानतळावरील सेवाही प्रभावित झाली आहे. १२ देशांतर्गत तर ४ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हवामान पाहून तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे बेंगळुरूकडे वळवण्यात आली आहेत. चेन्नई एअरपोर्टवरील रनवे आजरात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. विल्लुपुरम, मयिलादुथुराई, नागापट्टिनम, तिरुवल्लूर, कुड्डालोर आणि चेंगलपट्टूच्याप्र भावित जिल्ह्यात आठ एनडीआरएफ आणि ९ एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

पुढील बातम्या